शिवप्रहार न्यूज- जय बाबाजी भक्त परिवाराचा महामेळावा उत्साहात संपन्न...
जय बाबाजी भक्त परिवाराचा महामेळावा उत्साहात संपन्न...
प्रतिनिधी /श्रीरामपूर
मयूर फिंपाळे पाटील
श्री बाबाजींच्या उपस्थितीत जय बाबाजी भक्त परिवाराचा महामेळावा आज राजधानी वेरुळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
सर्वप्रथम वर्ष २०२२ मध्ये पार पडलेल्या सर्व विशेष उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये नविन ५ आश्रमांची उभारणी, दोन गुरुकुलांमध्ये वसतीगृहाचा शुभारंभ, १०८ आश्रमांत जन्मोत्सव सोहळा, महाश्रमदान, त्याअंतर्गत महावृक्षारोपण, गुरुपौर्णिमा, नुतन कुटिया उभारणी, साहित्य निर्मिती, ३३ व्या पुण्यस्मरणार्थ ४ ठिकाणी संपन्न झालेला राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा इ. विशेष उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
त्यानंतर आजीवन अन्नदान व महापुजा आरती योजनेचा अहवाल सादर करण्यात आला. श्री बाबाजींच्या कार्यात सेवेला प्राधान्य आहे, पदाला नाही या अनुषंगाने व श्री बाबाजींच्या आदेशाने सर्व पदरचना ही तुर्तास समर्पित करण्यात आली तसेच श्री बाबाजी संस्कारीत सर्व ट्रस्टची कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली. उत्तम गुरुभक्त म्हणुन प्रत्येकाने पालन करावयाच्या १९ नियमांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच वर्ष २०२३ मधील आगामी कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली. २०२३ हे वर्ष भारतीय संस्कृती वर्ष म्हणून साजरे केले जाईल व या वर्षी संपन्न होणारे सर्व सोहळे हे "निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा" या नावाने संपन्न होतील.
मेळाव्यासाठी छ.संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नगर, धुळे, जालना, पुणे इ. जिल्ह्यातील हजारो गुरुभक्त उपस्थित होते.