शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले वनकर्मचारी लक्ष्मण किंनकर यांचा संभाजीनगर येथे उपचारादरम्यान दूर्दैवी अंत …

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले वनकर्मचारी लक्ष्मण किंनकर यांचा संभाजीनगर येथे उपचारादरम्यान दूर्दैवी अंत …

श्रीरामपुरात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले वनकर्मचारी लक्ष्मण किंनकर यांचा संभाजीनगर येथे उपचारादरम्यान दूर्दैवी अंत …

श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती भागात असणाऱ्या मोहटा देवी मंदिर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता.या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सात ते आठ जण जखमी झाले होते.

       त्यामध्ये राहुरी वनपरिक्षेत्रात कार्यरत असलेले श्री.लक्ष्मण गणपत किंनकर, व्यवसाय -वनमजूर,राहणार- राहुरी यांच्यावर देखील बिबट्याने हल्ला करून मांडीला चावा घेतला होता.त्यामुळे त्यांच्यावर संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार चालू होते.परंतु बिबट्याच्या चाव्यामुळे बाधा झाल्याने तो संसर्ग किंनकर यांच्या शरीरात पसरला आणि त्यामुळे त्यांचा आज बुधवार दिनांक आठ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

       लक्ष्मण गणपत किंनकर यांना वनविभागातर्फे “वन शहीद”म्हणून गणण्यात आले आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.