शिवप्रहार न्युज - नेवासा येथे वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्या आरोपीकडुन 10,30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त...

नेवासा येथे वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्या आरोपीकडुन 10,30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त...
नेवासा/नगर- नमूद बातमीची हकीगत अशी की, मा. श्री राकेश ओला , पोलीस अधीक्षक यांनी पोनि श्री दिनेश आहेर, स्था.गु.शा. नगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकीविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप दरंदले, अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, शिवाजी ढाकणे,विशाल तनपुरे यांचे पथक तयार करुन अवैध वाळु उपसा करुन वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले.
नमुद पथक हे काल रात्री नेवासा तालुक्यामध्ये अवैध वाळु उपसा करुन वाहतुक करणारे इसमांची व वाहनांची माहिती काढत असतांना गुप्त बातमीदारामार्फत, खडकाफाटा ते नेवासा गावचे दिशेने जाणारे रोडवरुन एक विनाक्रमांकाचा पिवळा व पांढरे रंगाचा ढंपर मधुन वाळुची चोरुन वाहतुक होणार असलेबाबत पथकास माहिती मिळाली. पथकातील पोलीस अंमलदार यांनी तात्काळ खडका फाटा ते नेवासा गावात जाणारे रोडलगत असलेल्या ऑईल मिलजवळील ओढ्याजवळ सापळा रचुन थांबले असता रात्री 02.00 वा. चे सुमारास बातमीतील नमुद पिवळे व पांढरे रंगाचा डंपर भरधाव वेगात येतांना दिसला. पथकातील अंमलदार यांनी सदर ढंपरचालकास थांबवुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव प्रविण पोपट आढागळे ,वय 27 वर्षे, रा. खलालपिंप्री, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमाचे ताब्यातील डंपरची पाहणी केली असता त्यामध्ये वाळु मिळुन आल्याने सदर वाळु वाहतुकीचा परवाना आहे काय याबाबत विचारपुस करता त्याने त्याचेकडे वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. ताब्यातील इसमास डंपर मालकाबाबत विचारपुस करता त्याने सदर डंपरचा मालक राहुल थोरात (पुर्ण नांव गांव माहित नाही) रा. खलालपिंप्री, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हा असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमाकडुन 10,00,000/- रुपये किमतीचा विना क्रमांकाचा डंपर व 30,000/- रुपये किमतीची 3 ब्रास वाळु असा एकुण 10,30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पथकातील पोना/658 संदीप संजय दरंदले नेम - स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन इसम नामे प्रविण पोपट आढागळे वय 27 वर्षे, रा. खलालपिंप्री, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, 2) राहुल थोरात (पुर्ण नांव गांव माहित नाही) रा. खलालपिंप्री, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर (फरार) यांचेविरुध्द नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. 376/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास नेवासा पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे , अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व श्री सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अंमलदार व तपास पथकातील अंमलदार यांनी केली आहे.