शिवप्रहार न्यूज- कत्तलीसाठी आणलेल्या ०४ गोवंशांची सुटका;श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी…

शिवप्रहार न्यूज- कत्तलीसाठी आणलेल्या ०४ गोवंशांची सुटका;श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी…

कत्तलीसाठी आणलेल्या ०४ गोवंशांची सुटका;श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी…

श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर शहर पोलिसांना गुप्त खबर मिळाल्यावरून शहर पोलिसांनी काल १४ ऑगस्ट रोजी १२.४० च्या सुमारास श्रीरामपूर शहरातील कुरेशी मोहल्ला, मस्जिदच्या पुढे असलेल्या एका घराच्या आडोशाला वा. नं. २ भागात छापा टाकला. तेथे गोवंश जनावरांची तांबड्या पांढऱ्या रंगाची एक गाय, एक गोवंशी जातीची तांबडया पांढऱ्या रंगाची कालवड तसेच काळया पांढऱ्या रंगाची दोन गोवंशी जनावरांची वासरे अशी एकूण २२ हजार रूपये किंमतीची गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने व कोणतीही चारा पाण्याची काहीएक सोय न करता निर्दयीपणे बांधून ठेवलेली मिळून आली. 

        पोलिसांनी या गाय वासरांची सुटका केली. पोकॉ. गणेश पोपट गावडे, नेमणुकं शहर पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात आरोपी शाहरूख हुसेन कुरेशी, रा.वा.नं. २, श्रीरामपूर याच्याविरूद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे सुधारीत कायदा २०१५ चे कलम ५, ५(ब) सह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० कलम ११ (च) (ज) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. जाधव हे पुढील तपास करीत आहेत.