शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एकावर ॲट्रोसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल...

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एकावर ॲट्रोसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल...
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 07 भागात राहणाऱ्या बंटी मोहन आछडा, वय 36 याच्या विरोधात एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 368/2021 कलम 376,420 व ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिलेने असे नमूद केले आहे की,बंटी मोहन आछडा याने सन 2016 पासून वेळोवेळी पीडित महिलेवर त्याच्या राहत्या घरी, बंटी आछडा याच्या अशोकनगर येथील मित्राच्या फ्लॅटवर तसेच इतर ठिकाणी बलात्कार केला आणि लग्न केल्याचे दाखवुन कोणाला सांगू नको म्हणाला.
तसेच फ्लॅट खरेदी करून देतो म्हणून पीडित महिलेकडून 02 लाख 80 हजार रुपये घेऊन फ्लॅट न देता तिची फसवणूक केली अशीही तक्रार पिडीत महिलेने केली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास डीवायएसपी श्री.राहुल मदने हे करीत आहेत.