शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातून भारतीय जवानांना ३१०० राख्याची स्नेह भेट पोष्टाव्दारे रवाना...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातून भारतीय जवानांना ३१०० राख्याची स्नेह भेट पोष्टाव्दारे रवाना...

श्रीरामपुरातून भारतीय जवानांना ३१०० राख्याची स्नेह भेट पोष्टाव्दारे रवाना...

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-भारतीय सिमेचे रक्षण करण्यासाठी सदैव उभे असणाऱ्या जवानां प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच भावा बहिनीच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या रसाबंधन सणासाठी रिटायर्ड ब्रिगेडियर मा हेमंतकुमार ( मेडीकल सुप्री डेडंट प्रवरा मेडीकल ट्रस्ट लोणी ) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर येथील संस्कार भारती रांगोळी कलाकार सौ कलावती देशमुख व भुषण शिंदे यांनी स्वतः तयार केलेल्या ३१०० राख्या लेह श्रीनगर जम्मू आदी भागात कार्यरत असणाऱ्या भारतीय जवानांसाठी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रंशात पाटील व दैनिक जयबाबाचे कार्यकारी संपादक मनोज कुमार आगे यांच्या हस्ते पाठविण्यात आल्या .

   आपल्या घरापासून हजारो किलोमीटर दूर सिमेवर देशाच्या रक्षणासाठी उभे असणाऱ्या सैनिकांना आपल्या बहिनीची आठवण येत असते परतुं प्रत्येक जण घरी येऊ शकत नाही तरी त्यांना रक्षाबंधनाचा आनंद मिळावा व बहिनीची आठवण कायम रहावी यासाठी जो उपक्रम चालू केला त्याला तहसीलदार प्रंशात पाटील यांनी शुभेच्छा दिल्या .

           आज आपल्या देशात कट्टरता हा विषय फार महत्वाचा आहे . त्यामुळे आपल्यात देशप्रेमाची कट्टरता वाढली पाहिजे . त्या साठी आपल्या सरकारने घर घर तिरंगा मुळे आपल्या देशात देशप्रेमाची कट्टरता निर्माण होणार आहे . रक्षाबंधन हा नुसता सण नाही तर तो एक स्नेहभाव आहे . कोरोना काळात पैसा माणूस कामाला नाही आला . कामाला फक्त स्नेहभाव आला . तुम्ही हा स्नेहभाव सिमेवरील जवानापर्यत पाठवत आहात हे खरोखर कौतुकास्पद आहे . या कार्याला दैनिक जयबाबाचे कार्यकारी संपादक मनोज कुमार आगे यांनी शुभेच्छा दिल्या .

      यावेळी श्रीरामपूर पोस्ट ऑफिसचे अधिक्षक डाकघर हेमंत खडकीकर , तक्रार निरिक्षक विनायक शिंदे , पोस्टमास्तर सागर आढाव , विकास अधिकारी , विजय कोल्हे , असिस्टंट पोस्टमास्तर बाळासाहेब गोडगे , गोरख दहिवाळकर , नितीन मुसमाडे , राजेद्र गायकवाड , प्रांजली चव्हाण , राधाकिसन पवार , पुनम गिते , अमोल मुळे , गोंडेगावचे उपसंरपच योगेश बडधे , प्रवासी संघटनेचे बन्सी फेरवानी , सतपालसिंग , अमोल शेळके , निलेश बागुल आदी उपस्थित होते .