शिवप्रहार न्यूज - खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी जेरबंद; श्रीरामुपर तालुका पोलीसांची कामगीरी

खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी जेरबंद; श्रीरामुपर तालुका पोलीसांची कामगीरी
श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)- आज दि. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 च्या सुमारास श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि ज्ञानेश्वर थोरात यांना गुप्त बातमी मिळाली की, मौजे मांळवाडगाव ता.श्रीरामपुर येथील वारंवार मालमत्ता चोरीचे गुन्हे करणारा व श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर 64/2023 भा.द.वि.क. 307 वगैरे मध्ये पाहीजे असलेला सराईत गुन्हेगार सुजित अनिल आसने हा मांळवाडगाव येथे आपली ओळख लपवुन फिरत आहे. अशी मिळाल्याने सपोनि.थोरात यांनी तात्काळ एक पथक तयार करुन त्यातील सर्वांना वेषांतर करुन माळवाडगाव गावात सापळा रचुन थांबलो असताना आरोपी सुजित अनिल आसने हा त्याच्या मोटार सायकलवर येताना दिसला असता त्यास पोलीसांची चाहुल लागताच तो त्याची मोटार सायकल रस्त्यात सोडुन गावाच्या बाहेर ऊसाच्या शेतात पळत असताना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन मोठ्या शिताफीने आरोपीला बजाज कंपनीची मोटार सायकलसह ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन अटक करण्यात आली आहे.
आरोपी सुजित अनिल आसने सह तेजस दोन्ही रा. माळवाडगाव ता. श्रीरामपुर यांच्यावर श्रीरामपूर शहर, तालुका तसेच विरगाव पोलिस स्टेशन येथे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्हयांमध्ये सराईत गुन्हेगार यास मा.राकेश ओला, पोलीस अधीक्षक नगर, मा.स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर आणि मा.संदिप मिटके, उपविभागिय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोसई.संजय निकम, पोसई.अतुल बारसे, पोहेकॉ.नवनाथ वर्डे, पोहेकॉ.राजेंद्र लंबाडे, पोना.अशोक पवार, पोना.आबासाहेब गोरे, पोना.प्रशांत रणनवरे, पोना.अनिल शेंगाळे, पोका.संतोष कराळे, पोका.संदिप पवार, चापोकों.चंदभाई पठाण यांनी सदरची कारवाई केली आहे.