शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर MIDC मधून १५८ पोते गहू चोरला...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर MIDC मधून १५८ पोते गहू चोरला...

श्रीरामपूर MIDC मधून १५८ पोते गहू चोरला...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर एमआयडीसीत असणारे गोडाऊन फोडून गोडाऊनमधील १५८ पोते गहू किंमत रूपये ३ लाख ५६ हजार ८२५ चोरून नेण्याची घटना घडली आहे.

   याबाबत, शशिकांत वामनराव पाटील, वय-५२, यांनी पोलिमात फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की, आपण महाबिज प्रक्रिया केंद्र, खंडाळा येथे वरिष्ठ कृषि अभियंता म्हणून काम करतो. महाबिजच्या अतिरिक्त बियाणांची साठवणूक खासगी गोडाऊनमध्ये केली जाते. गोपाल झंवर यांच्या एमआयडीसी येथील खासगीगोडाऊनमध्ये महाबिजचा गहू साठवलेला आहे, काल १९ एप्रिल रोजी सदर ३ शटर असणाऱ्या आणि बाहेरून कुलूप लावलेल्या या गोडाऊनचे मुख्य शटरचे सिलबंद कुलूप उघडून आत पाहीले असता आतमधील गव्हाच्या गोण्या कमी असल्याचे लक्षात आले. तसेच आतमधील शटरची पाहणी केली असता एका शटरचे नटबोल्ट काढल्याचे दिसले. त्यामुळे या ठिकाणी चोरी झाल्याचे लक्षात आल्याने या ठिकाणी कामाला असणारे कनिष्ठ प्रक्रिया 'सहाय्यक सागर शिंदे हे गोडाऊनची पाहणी करायला गेले असता त्यांना बियाणांचे पोते अस्तव्यस्थदिसले, थप्पीही कमी झाल्याचे दिसले. त्यावरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने लोखंडी तारेचे कुंपण कशाच्यातरी सहाय्याने कट करून गोडाऊनचे लोखंडी शटरचे आतील नटबोल्ट काढून प्रवेश करून आतमधील १५८ पोते गहू हा चोरून नेल्याचे लक्षात आले. १८ एप्रिलच्या सायं. ६.३० ते १९ एप्रिलच्या सकाळी १०.१५ या दरम्यान ही चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.