शिवप्रहार न्यूज- तरुणीच्या तक्रारीवरुन देवळाली प्रवराच्या शेख विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

तरुणीच्या तक्रारीवरुन देवळाली प्रवराच्या शेख विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल...
देवळाली प्रवरा-या बाबातची हकीकत अशी की, येथील राहणार आरोपी फय्याज शेख याने पिडीत महीला फिर्यादीला चिंचोली फाटा ,तालुका राहुरी तसेच यशोधन लॉज, माळीवाडा ,नगर येथे घेऊन जाऊन तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे . म्हणुन पिडीत महीलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं 366/2021 भादंवि कलम 376 (2)( N) प्रमाणे आरोपी फय्याज असलम शेख राहणार देवळाली प्रवरा ,तालुका राहुरी
याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या घटनास्थळी श्री. संदीप मिटके,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर व पोनि. नंदकुमार दुधाळ ,राहुरी पोलीस स्टेशन यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पीएसआय श्री.वाघ हे करत आहेत.