शिवप्रहार न्यूज- काल पाटात मृतदेह आढळलेल्या तरुणीच्या नवऱ्यावर श्रीरामपुरात गुन्हा दाखल…
काल पाटात मृतदेह आढळलेल्या तरुणीच्या नवऱ्यावर श्रीरामपुरात गुन्हा दाखल…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 मधील मोरगे वस्ती भागात राहणारी तरुणी वैशाली उर्फ कल्याणी धीरज पारोळकर हिचा मृतदेह काल रविवारी सकाळी खंडाळा भागातील पाटाच्या पुलाला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
याप्रकरणी तरूणीच्या माहेरच्या मंडळींनी तिचा पती धीरज पारोळकर याच्याविरोधात घातपाताचे आरोप केले होते.त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मयत तरुणीचा पती धीरज व त्याच्या घरच्या सदस्यां विरोधात भादवि कलम 306 प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलिसांकडून (सपोनि बोरसे)चालू आहे.