शिवप्रहार न्यूज-श्रीरामपूर शहरात वार्ड नं.०३ & वार्ड नं.०४ मध्ये घरफोडीच्या घटना…

श्रीरामपूर शहरात वार्ड नं.०३ & वार्ड नं.०४ मध्ये घरफोडीच्या घटना…
श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर शहरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या असून बंद घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह ७४ हजारांचा ऐवज तर किराणा दुकानातून १२ हजारांचे साहित्य लांबविण्यात आले.या दोन्ही घटनेत पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील नामदेव मंदिररोड, वा. नं. ३ येथे राहणारे श्री. सुनिल निंद्रे हे मुलाला सोडण्यासाठी बिहारला गेलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी दरवाजाचे कुलूप तोडून घरात घुसून सामानाची उचकापाचक केली व ६५ हजारांची रोखड तसेच दुकानाचा ९ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत सुनील जगन्नाथ निंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हेड़ कॉन्स्टेबल आलम पटेल हे करण्यात अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत शहरातील वॉर्ड नं. ४, बाजारतळ परिसरात असलेल्या वैष्णवी किराणा दुकान आहे.चोरट्यांनी लोखंडी वजन काटा व किराणा माल, तेल, मसाला पुड्या व इतर सामान असे १२ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले.दुकान चालक बाबासाहेब सूर्यभान गोरे (रा. वार्ड नं. ४, श्रीरामपूर) यांनी शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून आहे. अज्ञात चोरट्याविरूद्ध भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आला आहे. पोलीस निरिक्षक संजय सानप मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. अहिरे हे अधिक तपास करीत.