शिवप्रहार न्यूज- केस मागे घ्यायला सांग' म्हणत चौघांकडून वडाळा महादेव शिवारात खुनाचा प्रयत्न …
'केस मागे घ्यायला सांग' म्हणत चौघांकडून वडाळा महादेव शिवारात खुनाचा प्रयत्न …
श्रीरामपूर- तालुक्यातील निपाणीवडगाव येथील मोठेबाबा लोखंडे यांना काल सायंकाळी चौघा जणांनी 'तू केस मागे घ्यायला सांग' म्हणत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. चाकूने वार होवून मोठेबाबा लोखंडे हे जखमी झाले आहेत. काल मनाली गार्डनजवळ, वडाळामहादेव शिवारात सायं. ६ वा. हा खूनाचा प्रयत्न झाला.
घटनास्थळी डिवायएसपी संदीप मिटके, पोनि. खाडे, पोसई सुरवाडे यांनी भेट दिली.
याप्रकरणी जखमी मोठेबाबा सालचा लोखंडे, वय ४९, रा.निपाणीवडगाव, ता. श्रीरामपूर यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून मारहाण करणारे आरोपी सुरेश मारूती लोखंडे, चंदन मारूती लोखंडे, आकाश सुरेश लोखंडे, मंगेश लक्ष्मण दासरजोगी सर्व रा. निपाणीवडगाव, ता.श्रीरामपूर यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठेबाबा लोखंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मोटारसायकलवरून वडाळा येथून निपाणीवडगावकडे येथे जात असताना वडाळामहादेव शिवारात मनाली गार्डनजवळ आरोपींनी थांबवून हातातील लाकडी दांड्याने मोटारसायकलच्या खोपडीवर मारून दुचाकीचे नुकसान केले. एका आरोपीने मोठेबाबा यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली, चाकू काढून त्यांच्या भाषेत "तू माझ्यावरची केस मागे घ्यायला सांग नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही" अशी धमकी देवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मानेवर चाकूने वार केला. तो हुकवला असता हातावर चाकू लागून गंभीर जखम झाली. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जखमीवर साखर कामगार रूग्णालयात उपचार सुरू असून पोनि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सुरवाडे हे पुढील तपास करीत आहेत.