शिवप्रहार न्यूज- जागतिक महिला दिनानिमित्‍ताने महिलांकरिता विविध स्‍पर्धा व सांस्‍कृतीक कार्यक्रमांचे आयोजन….

शिवप्रहार न्यूज- जागतिक महिला दिनानिमित्‍ताने महिलांकरिता विविध स्‍पर्धा व सांस्‍कृतीक कार्यक्रमांचे आयोजन….

जागतिक महिला दिनानिमित्‍ताने महिलांकरिता विविध स्‍पर्धा व सांस्‍कृतीक कार्यक्रमांचे आयोजन….

शिर्डी -

        श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने ०८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्‍ताने रविवार दि.१३ मार्च २०२२ रोजी संस्‍थानमधील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी भगिनी यांच्‍या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या संकलपणेतुन महिलाकरीता विविध स्‍पर्धा व सांस्‍कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येवुन सदरचे कार्यक्रम उत्‍साही वातावरणात पार पडले. 

          संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम पार पडला असुन या कार्यक्रमाकरीता प्रमुख अतिथी म्‍हणुन सौ.रश्‍मीताई अविनाश दंडवते, सौ.सुरेखाताई महेंद्र शेळके, सौ.स्मिताताई सुहास आहेर, सौ.पौर्णिमाताई सचिन गुजर, सौ.कस्‍तुराबाई धिवरे, सौ.माधुरीताई शिंदे, सौ.दिपालीताई करण ससाणे, तसेच गौरवचिन्‍हाचे आयाजेक सौ.प्रणजाताई भुज‍बळ, सौ.अनुराधा खोत आदी मान्‍यवर उपस्थित होते. याप्रसंगी संस्‍थान महिला अधिकारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

          याप्रसंगी बोलताना मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत म्‍हणाल्‍या की, आजपर्यंत संस्‍थानमार्फत कधीही महिलांकरीता असे कार्यक्रम आयोजित करण्‍यात आलेले नव्‍हते. तसेही ३६५ दिवस हे महिलांचे असतात परंतु फक्‍त महिलांकरीता हा दिवस एक विशेष म्‍हणुन साजरा करण्‍यात येत आहे. तसेच मी ही एक महिला आहे. त्‍यामुळे मी तुमच्‍या भावना समजू शकते. सर्व महिलांनी आता या कार्यक्रामानिमित्‍त जो उत्‍साह निर्माण केला आहे. त्‍याच उत्‍साहाने आप-आपल्‍या विभागातील कामेही उत्‍साहरितीने पार पाडावे व कामाचा आनंद घ्‍यावा, असे सांगुन यावेळी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्‍या शुभेच्‍छा ही दिल्‍या. तसेच या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती व त्‍यांनी सादर केलेल्‍या विविध कला गुणांचे कार्यक्रम पाहुण श्रीमती बानायत भारावुन गेल्‍या होत्‍या. 

           दिनांक ०८ मार्च हा जागतिक महिला दिन म्‍हणुन साजरा केला जातो. परंतु सर्वांच्‍या सोयीच्‍या दृष्‍टीने संस्‍थानतर्फे रविवार दिनांक १३ मार्च २०२२ रोजी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. श्री साईबाबा संस्‍थानच्‍या इतिहासात प्रथमच महिला दिन मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यात येवुन यानिमित्‍त विविध कलागुण स्‍पर्धेचे (नृत्‍य, नाटक, पथनाट्य, गायन, वादन, चुटकुले, उखाणे, खाद्यपदार्थ स्‍टॉल, हस्‍तकला वस्‍तूंचे स्‍टॉल, फनी गेम्सचे स्‍टॉल, मंगळागौर खेळ, चमचा - लिंबु, उलटे चालणे, धावणे, निबंध, स्‍वरचित काव्‍य, भक्‍तगिते, रांगोळी स्‍पर्धा, रोल प्‍ले, फॅशन शो इ.) आयोजन करण्‍यात आले होते. सदरच्‍या कार्यक्रमात संस्‍थानमधील कायम, कंत्राटी, बाह्यस्‍त्रोत असे सुमारे ४०० महिला कर्मचारी यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. विविध बचतगटातील महिलांनीही कार्यक्रम स्‍थळी खाद्यपदार्थ स्‍टॉल, हस्‍तकला वस्‍तूंचे स्‍टॉल, फनी गेम्सचे स्‍टॉल लावण्‍यात आले होते. आयोजित करण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेचे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाचे तसेच उत्‍तेजनार्थ बक्षीस देणेत आले. कार्यक्रमाचे बक्षिस वितरण वेळी सहभागी कर्मचारी व अधिकारी यांनी आपले मनोगत मांडले. यावेळी प्राचार्या श्रीमती शिल्‍पा वैद्य यांनी आयोजकांचे, परिषकांचे, स्‍पर्धकांचे व उपस्थित मान्‍यवरांचे आभार मानले.  

         हा कार्यक्रम यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकरी श्रीमती भाग्‍यश्री बानायत, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, व वैद्यकिय संचालक डॉ.प्रि‍तम वडगावे यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकिय अधिक्षीका डॉ. सुनिता कडू, प्राचार्य श्रीमती शिल्‍पा वैद्य व सर्व विभागातील महिला कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.