शिवप्रहार न्यूज- लोणी खुर्द विविध कार्यकारी सेवा संस्थेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न….
लोणी खुर्द विविध कार्यकारी सेवा संस्थेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न….
लोणी - आज वार गुरुवार दि २० रोजी सकाळी ९.०० वा संस्थेचे आमदार चंद्रभान दादा घोगरे पाटील सभागृहात संस्थेचे मार्गदर्शक सन्मा एकनाथराव घोगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पा आहेर याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी संस्थापक आमदार चंद्रभान दादा घोगरे पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले त्यानंतर सभेच्या अजंठेवरिल सर्व विषय संस्थेचे सचिव सोमनाथ पवार यांनी वाचन केले व त्या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येवुन त्यास सभेने सर्वानुमते मान्यता दिली.
मागील १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ मध्ये तेरीज ताळेबंद पत्रकातील लाखो रुपये अनावश्यक खर्च दिसतो त्यात जाहिरात, जुने गोडाऊन दुरुस्ती व उद्घाटन खर्च, रंगरंगोटी, तसेज तिन लाख रुपयांच्या वसुलीसाठी बारा लाख रुपये कोर्ट खर्च यात संस्थेचा जवळपास विस लाख रुपये बोगस खर्च झालेला असुन यावर सभासदांनी तत्कालीन संचालक मंडळाच्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त केली. या खर्चामुळे विस वर्षापासून संस्थेला केंद्र शासनाकडून सक्षमीकरण योजनेचा दिड लाख रुपये चा लाभ मिळालेला नाही म्हणजेच संस्थेचा यातही जवळपास तिस लाख रुपये तोटा झालेला असुन सदर बाब अतीशय गंभीर असुन भविष्यात संस्थेत तिन महिन्यांपूर्वी मोठ्या विश्वासाने सरपंच जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या निवडणुकीत १३/ ० असे नवनिर्वाचित संचालक मंडळ सभासदांनी खुप विश्वासाने निवडुन दिलेले असुन त्यांनी चांगला व स्वच्छ कारभार करावा अशी प्रतिक्रीया अनेक सभासदांनी व्यक्त केली.
सभेत श्रीकांत मापारी यांनी विस वर्षात संस्थेच्या कार्यक्षेत्रात सातबारा उतारा नावे नसलेले व कार्यक्षेत्राबाहेरील अनेक लोक की ज्यांचा संस्थेत एक रुपया व्यवहार नाही त्यांना सभासदत्व दिलेले आहे ही बाब अतीशय चुकीची असुन संस्थेच्या व सहकार खात्याचे सर्व नियम डावलून असल्याने ते सर्व सभासद कमी करण्याचा ठराव मांडला तो सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेज रायभान आहेर यांनी संस्थेस उज्ज्वल परंपरा असुन आपली संस्थेची जिल्हात एक वेगळी ओळख होती परंतु परिस्थिती नुसार हा बदल झाला परंतु संस्थेस गतवैभव प्राप्त होण्यासाठी सरपंच जनार्दन घोगरे व संचालक मंडळाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राजेंद्र पा घोगरे म्हणाले आता स्पर्धेचे युग आहे राष्ट्रीयकृत बैक चांगले व्यवहार असलेल्या शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन कर्जासाठी संपर्क करतात तशी चं सेवा आपल्या संस्थेमार्फत गावात राबवावी त्याचा गावातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल व संस्थेच्या उत्पन्नात ही भर पडेल अशी भावना त्यानी व्यक्त केली
त्यानंतर सभेचे प्रमुख मार्गदर्शक एकनाथ पा घोगरे यांनी संस्थेचा ७६ वर्षाच्या काही जुन्या आठवणी सांगताना या संस्थेचे मोठा खते डेपो, किराणा माॅल, कापड दुकान, स्वस्त धान्य दुकान, डिझेल लायसन्स, होते परंतु या सर्व उपविभाग होते परंतु हे सर्व विभाग आता बंद झालेले आहे. आजपर्यंत वारेमाप खर्च केल्याने संस्था अडचणीत आनली असुन यापुढे सत्तेवर आलेल्या नवीन संचालक मंडळाने सभासदांचे व संस्थेचे हित जोपासण्यासाठी अनावश्यक खर्च पुर्णपणे टाळवा म्हणजे केंद्र शासनाकडून सक्षमीकरण सारखे अनुदानासाठी आपली ही संस्था पात्र होईल असा आशावाद त्यानी व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी उपस्थित सर्व सभासदांचे आभार मानले यावेळी लोणी खुर्द ग्रा.पं चे सरपंच जनार्दन घोगरे, व्हा.चेअरमन बाबासाहेब मापारी, व त्याचे सर्व संचालक लोणी खुर्द जिल्हा बैक शाखाधिकारी श्री उगले, आबासाहेब आहेर, त्र्यंबकराव जोशी, देवमन घोगरे, सुभाष आहेर, रायभान आहेर, संजय आहेर, उत्तमराव घोगरे, विलास आहेर, विलास घोगरे, आनिल आहेर, चांगदेव घोगरे, मधुकर घोगरे, दिनकर आहेर, गणेश दिघे, बाळासाहेब आहेर, दिपक घोगरे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेचे प्रस्ताविक संस्थेचे संचालक महेश आहेर यांनी केले.