शिवप्रहार न्यूज - आयोध्येतील श्रीराम मंदिर बॉम्बने उडवू म्हणणारा राहुरी तालुक्यातील अनिल घोडके झाला बाबा जान मुसा ?
आयोध्येतील श्रीराम मंदिर बॉम्बने उडवू म्हणणारा राहुरी तालुक्यातील अनिल घोडके झाला बाबा जान मुसा ?
अयोध्या/राहुरी (शिवप्रहार न्युज)- कोट्यावधी हिंदूंचे श्रध्दास्थान असलेल्या पवित्र आयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीतील श्रीराम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीसह उत्तर प्रदेश पोलिसांनी पकडला असून तो राहुरी कृषी विद्यापीठाजवळील एका गावात राहणारा आहे. त्याचे मुळ नाव अनिल रामदास घोडके असून त्याने बाबा जान मुसा असे नाव उत्तर प्रदेशात बदलले व त्याने त्याचे व त्याची पत्नी दोघांचे बनावट आधार कार्ड व ओळख पत्र बनवले असे त्याने युपीच्या पोलीसांना सांगीतले आहे. त्याची माहीती खरी आहे का ? याची युपी पोलीस चौकशी करीतआहे. गत २ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ च्या सुमारास श्रीराम जन्मभूमी परिसरालगत राहणाऱ्या मनोज कुमार यांना एका व्यक्तीने राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. अयोध्या पोलिसांना तपासात आढळले की, आरोपीने आपल्या गर्लफ्रेंड चा भाऊ बिलालला अडकवण्यासाठी त्यांच्या मोबाईल नंबरवरून नेट कॉलिंग करून राम मंदिर व मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी दिली होती.
अयोध्येचे सर्कल ऑफिसर एस.के.गौतम यांनी सांगितले की, मनोज कुमार यांच्याकडे ज्या क्रमांकावरून फोन आला त्याची सर्व्हिलांसच्या मदतीने चौकशी करण्यात आली. त्यात अनिल रामदास घोडके उर्फ बाबा जान मूसा नामक व्यक्तीने दिल्लीच्या बिलालला फसवण्याच्या हेतूने नेट कॉलिंग करून त्याच्या नावाने धमकी दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने अनिल रामदास घोडके व त्याची पत्नी जार्ड संतन शाणी एश्वेरा उर्फ आयरन सॅटर्न हेल या दोघांना पकडण्यात आले. आरोपी सातत्याने पोलिसांची दिशाभूल करत होते. स्वतःला कधी चेन्नई तर कधी महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याची बतावणी करत होते.
मधुबन सिंह यांनी सांगितले की, मनोज कुमार यांच्या फोनवर पहाटे ५ च्या सुमारास एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. मनोज यांनी त्यांना तुम्ही कोण व कुठून बोलत आहात? असे विचारले असता त्यांनी आपण दिल्लीहून बोलत असल्याचे सांगितले. आज सकाळी १० वाजेपर्यंत राम जन्मभूमी उडवण्यात येईल अशी धमकीही त्याने दिली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ९ मोबाइल फोन, लॅपटॉप, २ कुराण, २ मुस्लीम टोप्या, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, चेक बूक, बर्थ सर्टिफिकेट, इलेक्शन कमिशनचे २ साधे फॉर्म, सुधारित आधार कार्ड, ताबीज मालासह अनेक आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली आहे. त्याने श्रीराम जन्मभूमीसह दिल्ली मेट्रो स्टेशनही बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती.
अनिल रामदास घोडके उर्फ बाबा जान मीसा आणि त्याची पत्नी हे आरोपी कीती दिवसांपासून उत्तर प्रदेशात वास्तव्यस आहे ? नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात ते कोणाच्या ओळखीचे आहेत ? त्यांचे नातेवाईक कोण ? त्याचे नाव हिंन्दु व मुसलमान कसे ? त्यांच्याकडे सापडलेल्या संशयीत वस्तु कोठूण आल्या ? त्यांना तांत्रीक ज्ञान किती ? ते मुळचे कुठले ? धमकी देणाऱ्याची बायको नेमकी कोण ? ते नेमके कोणत्या धर्माचे ? त्यांचे साथीदार कोण ? त्यांना पैसा कोण पुरवतो ? त्यांचा कामधंदा काय ? त्याने कोणच्या सांगण्यावरून धमकी दिली ? त्यांचे आधारकार्ड खरे आहे का ? ते कोणी बनवून दिले ? या गंभरी प्रश्नांचा उलगडा तपास यंत्रणांना जबाबदारीने करावा लागणार आहे. कारण प्रेयसीच्या भावाला अडकवीन्यासाठी थेट श्रीराम मंदिर उडवून देण्याची धमकी ? हिन्दू नाव असतांना मुस्लीम नाव ? पत्नीचे नाव बदलले ? या अतिशय संशयीत व गुढ प्रश्नांची उकल सध्या युपीचे पोलीस करत आहे. दरम्यान नगर जिल्हा पोलीस दलही या गंभीर प्रकरणी सतर्क झाले असल्याचे समजते.