शिवप्रहार न्यूज- अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
नेवासा(शिवप्रहार न्युज)- येथील ज्ञानेश्वर मंदीरापाठीमागे टाटा टेम्पो विनापरवाना बेकादेशिररित्या वाळु भरुन चोरुन वाहतुक करणाऱ्या टेम्पोसह 3 लाख 10 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई नगर स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नेवासा गावात ज्ञानेश्वर मंदीरापाठीमागे एक विटकरी रंगाचा टाटा कंपनीचा 909 मॉडेलचा टेम्पो विनापरवाना बेकादेशिररित्या वाळु भरुन चोरुन वाहतुक करीत आहे तुम्ही आता गेल्यास तो मिळुन येईल अशी खात्रीशीर गुप्त बातमी मिळाल्याने पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, शंकर चौधरी ,राहुल यादव, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले संदीप दरंदले या पथकातील कर्मचाऱ्यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जावून खात्री केली असता नेवासा गावात ज्ञानेश्वर मंदीरापाठीमागे सापळा लावुन थांबलो असता थोडयावेळाने नमुद बातमीप्रमाणे एक विटकरी रंगाचा टाटा कपंनीचा 909 मॉडेलचा टेम्पो येताना दिसला आमची व पंचांची खात्री होताच सदर ठिकाणी 19/00 वा चे सुमारास टेम्पोवरील चालकास थांबविण्याचा इशारा केला असता सदर टेम्पोवरील चालकाने टेम्पो रोडचे कडेला थांबविला त्यात ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष बाळासाहेब गायकवाड वय-30 वर्षे रा.बहीरवाडी, ता नेवासा असे असल्याचे सांगीतले सदर पकडलेल्या टेम्पोची पाहणी करता सदर टेम्पोमध्ये वाळु मिळुन आल्याने सदर चालकास वाळु वाहतुकीबाबत परवाना आहे अगर कसे याबाबत विचारपुस केली असता त्याने कोणताही प्रकारचा परवाना नसलेबाबत सांगीतले. सदर टेम्पो चालकास टेम्पोचे मालकाबाबत विचारपुस केली असता त्याने टेम्पो मालकाचे नाव विजय धनवटे रा.भेंडा, ता.नेवासा हा मालक असल्याचे सांगीतले वरील टेम्पो चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना बेकायदेशिरपणे शासकीय वाळु चोरुन वाहतुक करताना मिळुन आला आहे. पकडलेल्या टेम्पोचे व वाळुचे वर्णन खालीलप्रमाणे 1) 3,00000/- रुपये किया एक विटकरी रंगाचा टाटा कंपनीचा 909 मॉडेलचा विनानंबरचा टेम्पो 2) 10,000/- रुपये किं.ची नमुद टेम्पो मध्ये 1 ब्रास शासकीय मालकीची वाळु किं.अंदाजे असा 3,10,000/- एकूण वरील वर्णनाचा व किंमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष सदर टेम्पोचा व वाळुचा पंचनामा पोना.राहुल यादव, नेमुणक-नेवासा पोस्टे यांनी वरील वर्णनाचा मुददेमाल जागीच जप्त करुन ताब्यात घेवुन मूददेमालासह नेवासा पोलीस स्टेशन येथे वरील टेम्पो 1) चालक नाने संतोष बाळासाहेब गायकवाड वय 30 वर्षे रा.बहीरवाडी, ता.नेवासा आणि टेम्पोचा मालक 2) विजय धनवटे (पुर्ण नाव माहीत नाही) रा.भेंडा, ता.नेवासा (फरार) यांचेविरुदध भादवि कलम 379 प्रमाणे कायदेशिर पोना.संदीप संजय दरंदले नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा नगर यांनी फिर्याद दिली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, शंकर चौधरी, राहुल यादव, लक्ष्मण खोकले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले यांच्या पथकाने कारवाई केली.