शिवप्रहार न्यूज - शिवप्रहार प्रतिष्ठानच्या मावळ्यांमुळे श्रीरामपुरात विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या लव जिहादीविरोधात गुन्हा दाखल...
शिवप्रहार प्रतिष्ठानच्या मावळ्यांमुळे श्रीरामपुरात विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या लव जिहादीविरोधात गुन्हा दाखल...
श्रीरामपूर - शहरातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीची छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 117/ 2023 हा विनयभंग व पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.यातील आरोपी फारुक हा शहरातील वार्ड नंबर ०२ भागातील नवी दिल्ली परिसरात राहतो.
प्रकरणी अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर शहरातील एका ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला काल दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी व त्यापूर्वी देखील शहरात सायकल वरून जात असताना हात ओढून,लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन आरोपी फारूक याने केले. या घडलेल्या विनयभंगाच्या प्रकारामुळे अल्पवयीन पीडित मुलगी व तिचे आई-वडील हे अतिशय भयभीत झालेले होते.या वेळी लव्ह जिहादचा गंभीर विषय म्हणून "शिवप्रहार प्रतिष्ठान"च्या मावळ्यांनी त्यांना आधार देऊन हिंमत दिली व या संकटात "शिवप्रहार" तुमच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे सांगितले आणि त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्री.हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.समाधान सुरवडे हे करीत आहेत.
शिवप्रहार प्रतिष्ठानचे अठरापगड जातीचे मावळे लव जिहाद या विषयासंदर्भात प्रचंड मेहनत घेऊन जनजागृती करतात,हिंदू माय-लेकींचे रक्षण देखील करतात. तसेच लव जिहाद च्या प्रकरणांमध्ये पीडित मुलीच्या व परिवाराच्या पाठीशी उभे राहून सर्वतोपरी सहकार्य करतात. यातुन छत्रपती शिवाजी महाराजांची अठरापगड जातीच्या माय-लेकींच्या अब्रूचे रक्षण करण्याची शिकवण प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे बिगरराजकीय कार्य शिवप्रहार करत असतांना श्रीरामपूर शहरातील एका नेत्याने पाळलेले पाळीव भामटे हे शिवाजी महाराज-संभाजी महाराज यांचे नाव घेऊन तरुण पिढीची दिशाभूल करून शिवप्रहार प्रतिष्ठानच्या पवित्र "शिवकार्याला" नाव ठेवण्याचे काम करीत आहे.
वर्षानुवर्षे हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांना जमवुन पदं घेणारे हे भामटे एकीकडे आणि फक्त ०२ वर्षात १०० पेक्षा जास्त लव्ह जिहाद प्रकारात हिंदू-मायलेकींची अब्रू वाचवणारे,हिंदूंच्या संकटकाळी त्याला मदत करणारे असे शिवप्रहारचे मावळे दुसरीकडे यातील फरक श्रीरामपुरातील हिंदू समाजाला स्पष्टपणे दिसतच असेल.