शिवप्रहार न्युज -श्रीरामपुरात आरोपी मोहन शर्मा कडून राहुलच्या खुनाचा प्रयत्न...

श्रीरामपुरात आरोपी मोहन शर्मा कडून राहुलच्या खुनाचा प्रयत्न...
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील सुलतान नगर ,वार्ड नंबर 2 या भागांमध्ये आरोपी मोहन अजय शर्मा याने काल दुपारच्या सुमारास राहुल दीपक मंगलम,वय 21 वर्ष,राहणार -बजरंग चौक,वॉर्ड नंबर 2,श्रीरामपूर याला दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली.त्यावर राहूल मंगलम याने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी मोहन शर्माने राहुल याला घाणघाण शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तसेच हातातील चाकूने राहुलच्या तोंडावर,गळ्यावर,डोक्यात व इतर ठिकाणी वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा रजिस्टर नंबर 610/2021 भादवि कलम 307, 323 ,504 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री.समाधान सुरवाडे हे करीत आहेत.
गुन्ह्याच्या घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉक्टर दिपाली काळे व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.संदीप मिटके यांच्यासह पोलिस निरीक्षक सानप यांनी भेट दिली.