शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात पोलीस ठाण्यात भरदिवसा प्राध्यापकाने केला पोलिसावर चाकूने हल्ला…

श्रीरामपुरात पोलीस ठाण्यात भरदिवसा प्राध्यापकाने केला पोलिसावर चाकूने हल्ला…
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील जुन्या तहसिल कचेरी आवारात असणाऱ्या तालुका पोलिस स्टेशनच्या परिसरात विनोद बर्डे नावाच्या एका प्राध्यापकाने आज भरदिवसा एका पोलिसावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आज सोमवार दिनांक 23 मे रोजी दुपारी २.१५ वा प्राध्यापक विनोद बर्डे -राहणार श्रीरामपूर याच्या विरोधात त्याचे नातेवाईक फिर्याद देण्यासाठी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आले होते.त्यावेळी प्राध्यापक बर्डे याने पोलीस ठाण्यात वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्याच्याकडील चाकू काढून त्याने तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस शिपाई बढे यांच्यावर हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
तसेच फिर्याद देण्यासाठी आलेल्या प्राध्यापक किशोर शिवाजी शिंदे या नातेवाईकावर देखील विनोद बर्डे नावाच्या प्राध्यापकाने चाकूने वार केला.तेव्हा उपस्थित इतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्राध्यापक बर्डे याच्याकडुन चाकू ताब्यात घेऊन त्याला पकडले व त्याला खाकीचा फुल प्रसाद दिला.यावेळी तात्काळ जखमी पोलीस व फिर्याद देण्यासाठी आलेल्या नातेवाईकाला साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती समजताच श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत व पुढील कारवाई चालू केली आहे.