शिवप्रहार न्यूज -तेलकुडगाव मध्ये सहा दिवसाचा कडकडीत "जनता कर्फ्यू...      

शिवप्रहार न्यूज -तेलकुडगाव मध्ये सहा दिवसाचा कडकडीत "जनता कर्फ्यू...       

तेलकुडगाव मध्ये सहा दिवसाचा कडकडीत "जनता कर्फ्यू...

     

तेलकुडगाव- ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्तरीय दक्षता समिती, सर्व व्यवसायिक बंधू, यांची ग्रामपंचायत मध्ये आज सोमवार दि. १७/०५/२०२१ रोजी सकाळी नऊ वाजता आढावा बैठक घेतली. कोरणा विषाणू मुळे तेलकुडगाव येथील चांगल्या कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर काय उपाययोजना कराव्यात यावर सविस्तर चर्चा झाली. तेलकुडगाव मध्ये कोरोना विषाणूमुळे प्रादुर्भाव-संसर्ग होऊन रुग्ण वाढू नये, यासाठी उपाययोजना म्हणून सर्व चर्चा करून तेलकुडगाव मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी सहा दिवसाचा कडकडीत "जनता कर्फ्यू" ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

         त्यामुळे तेलकुडगांव येथे मंगळवार दि. १८/०५ /२०२१ ते सोमवार दि. २४/०५ /२०२१ सकाळी ६:०० पर्यंत कडकडीत बंद "जनता कर्फ्यू" ठेवण्यात आला असून या काळात मेडिकल, हॉस्पिटल, दूध डेअरी वगळता, किराणा दुकाने, टपरीधारक, कृषी सेवा केद्रं, भाजीपाला या सह सर्व व्यवसाय बंद राहतील याची सर्वानी नोंद घ्यावी. 

           सर्व ग्रामस्थांनी, दुकानदारांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, विनाकारण कोणीही फिरू नये, सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच हे सर्व निर्णय आपल्या तेलकुडगांवच्या हितासाठीच असून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तेलकुडगाव ग्रामपंचायत, ग्रामस्तरीय दक्षता समितीने केले आहे.