शिवप्रहार न्यूज-धक्कादायक!!! श्रीरामपुरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारामध्ये चालतो मटका जुगार; प्रांत पवारसाहेब,Dy.SP मिटकेसाहेब आपण लक्ष घालावे…

शिवप्रहार न्यूज-धक्कादायक!!! श्रीरामपुरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारामध्ये चालतो मटका जुगार; प्रांत पवारसाहेब,Dy.SP मिटकेसाहेब आपण लक्ष घालावे…

धक्कादायक!!! श्रीरामपुरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारामध्ये चालतो मटका जुगार; प्रांत पवारसाहेब,Dy.SP मिटकेसाहेब आपण लक्ष घालावे…

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील बेलापुररोडवर असणाऱ्या बेलापूर नाक्याजवळील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार /वेस/कमान या ठिकाणी मटक्याचा जुगार चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

         छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या मोठ्या खांबाच्या आतमधील जागेत शहरातील एका “मटका माफिया”ने हा धंदा थाटला आहे.त्यासंदर्भातला सोबतचा फोटो स्थानिक नागरिकांकडून “शिवप्रहार न्यूज”ला पुरवण्यात आला आहे.तरी श्रीरामपूरचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी पवार साहेब व सिंघम पोलीस अधिकारी Dy.SP मिटके साहेब जे नगर जिल्ह्यात अतिशय चांगले व लोक हितकारक कर्तव्य करीत आहेत. त्यांनी या धक्कादायक प्रकाराकडे लक्ष घालावे व आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमी,सर्वसामान्य श्रीरामपूरकर व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 

        नवतरुण पिढी व अनेक महिलांचे सुखी संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या अशा अवैध धंद्यांविरोधात “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”च्या वतीने गांधी पुतळा येथे आमरण उपोषण पुकारण्यात आलेले असून कडाक्याच्या थंडीत व पहाटे सुरु झालेल्या पावसामध्ये देखील रात्रभर उपोषण सुरु ठेवले आहे. 

          आज या उपोषणाचा दुसरा दिवस सुरु झाला असुन श्रीरामपूर शहर व तालुक्यातील हे अवैध धंदे लवकरात लवकर बंद झाले नाही तर लक्षवेधी व याहुन मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी चंद्रशेखर (चंदू)आगे यांनी दिला आहे.