शिवप्रहार न्यूज- देव तारी त्याला कोण मारी;टँकरच्या धडकेत मर्सिडीजचा भुगा परंतू गाडीतील ०५ जण जिवंत …
देव तारी त्याला कोण मारी;टँकरच्या धडकेत मर्सिडीजचा भुगा परंतू गाडीतील ०५ जण जिवंत …
नगर - नगर ते पुणे महामार्गावरील चास गावाजवळ एचपी गॅस चा टँकर व मर्सिडीज बेंज या दोन वाहनांच्या धडकेमध्ये मर्सडीज बेंज गाडीचा पार फुगा झाला.मर्सिडीज बेंजची परिस्थिती पाहून असे वाटत होते की गाडीत कोणीही जिवंत वाचले नसेल.परंतु स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने मदत कार्य ज्यावेळेस चालू झाले त्यावेळेस मर्सडीज मधील पाचही लोक सुखरूप मिळून आले.
पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही गाड्या वेगळ्या करण्यात आल्या व पाचही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.