शिवप्रहार न्यूज - प्रवरासंगम येथे चार जण बुडाले…
प्रवरासंगम येथे चार जण बुडाले…
नेवासा /प्रवरा संगम (शिवप्रहार न्यूज)- आज नेवासा तालुक्यातील प्रवारासंगम परिसरात श्री.क्षेत्र सिद्धेश्वर महादेव मंदिर ,घाट मढी येथे गोदावरी नदीचे पाणी यात्रेसाठी नेण्यासाठी आलेले तरुण नदीतून पाणी घेत असताना एकाचा पाय घसरला.त्यावेळी त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने मदत केली,दुसऱ्याला वाचण्यासाठी तिसऱ्याने मदत केली,तिसऱ्याला वाचविण्यासाठी चौथीने मदत केली.चौथ्याला वाचविण्यासाठी पाचव्याने मदत केली.यात चौघेजण पाण्यात बुडून मयत झाले.तर पाचवा वाचला.
हे सर्वजण वैजापूर तालुक्यातील आहेत.घटनास्थळी स्थानिक तरुणांनी व नागरिकांनी मोठी मेहनत घेऊन जीव धोक्यात घालून पाण्यातून मृतदेह बाहेर काढत आहे.ते काम सुरू अजुन आहे.
अतिशय दुखद घटना घडल्याने सर्वत्र व्यक्त होत आहे पोलीसही घटनास्थळी पोहोचले असुन प्रवरासंगम येथे प्रवरा-गोदावरी या नद्यांचा संगम असून नाथ सागर म्हणजेच जायकवाडी धरणाचा थोप या ठिकाणी असल्याने पाण्याचा अंदाज बाहेरून येणारे भक्तांना येत नाही आणि म्हणून अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू होतात.