शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात पुरुष जातीचे अर्भक सापडले…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात पुरुष जातीचे अर्भक सापडले…

श्रीरामपूर शहरात पुरुष जातीचे अर्भक सापडले…

श्रीरामपूर -शहरातील वा. नं. ६ मधील साखर कामगार हॉस्पीटलच्या जवळील सांडपाण्याच्या नालीजवळ एक पुरूष जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळले आहे.

     याबाबतची अधिक माहिती अशी की, दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास साखर कामगार हॉस्पीटल, श्रीरामपूर येथील सांडपाण्याच्या नालीजवळ एक पुरूष जातीचे अर्भक मयत अवस्थेत टाकून बाळाचा जन्म झाल्याचे लोकांपासून लपवून ठेवण्यांच्या उद्देशाने कोणीतरी या मयत अर्भकाची विल्हेवाट लावल्याचे आढळून आले. 

     याप्रकरणी अजय भाऊराव गायकवाड, वय - ५३, धंदा चहा टपरी, रा. साखर कामगार हॉस्पीटलजवळ, वा.नं. ७, श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात भादंवि कलम ३१८ प्रमाणे गुरनं. ७९४/२०२२ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना. पंडीत हे करीत आहेत.