शिवप्रहार न्यूज-वळदगाव बंधाऱ्याच्या फळ्या न काढल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकाचे नुकसान…
वळदगाव बंधाऱ्याच्या फळ्या न काढल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकाचे नुकसान…
वळदगाव/उंबरगाव/चांदेगाव -वळदगाव येथील प्रवरा नदीवरील कोल्हापूर टाईप बंधाऱ्याला पाटबंधारे विभागाने नेमणूक केलेल्या यंत्रणेमार्फत नुकतेच फळ्या टाकून ठेवल्यामुळे प्रवरा नदीचे वाढलेले पाणी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अचानक प्रवरा नदीचा प्रवाह वाढल्यामुळे या फळ्यांचा अडथळा त्याला निर्माण झाला आणि पाणी आजूबाजूच्या उसाच्या व सोयाबीनच्या शेतात घुसून त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे .शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.