शिवप्रहार न्यूज- एकलहरेत गळफास घेवून तरुणाची आत्महत्या…

शिवप्रहार न्यूज- एकलहरेत गळफास घेवून तरुणाची आत्महत्या…

एकलहरेत गळफास घेवून तरुणाची आत्महत्या…

श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गावामध्ये राहणारा तरुण एकनाथ विश्वनाथ घायतडक ,वय 37 याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

      याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात काल अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून श्रीरामपुर शहरातील एका रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर एकनाथ याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.मयत एकनाथ याच्या पश्चात आई ,वडील ,पत्नी व मुलासह मोठा परिवार आहे.नेमक्या कोणत्या कारणाने एकनाथ यांनी आत्महत्या केली याचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवार यांच्याकडून चालू आहे.