शिवप्रहार न्युज - पतीच्या मदतीने “नगरच्या बाईने पुण्याच्या शेठचे २७ लाख लुटले”...

शिवप्रहार न्युज -  पतीच्या मदतीने “नगरच्या बाईने पुण्याच्या शेठचे २७ लाख लुटले”...

पतीच्या मदतीने “नगरच्या बाईने पुण्याच्या शेठचे २७ लाख लुटले”...

नगर- या घटनेची माहिती अशी की,नगर केडगाव येथे राहणाऱ्या एका महिलेने नातेवाईकाच्या माध्यमातून उरळीकांचन येथील एका सोन्याच्या सराफ व्यावसायिक शेठ सोबत संपर्क करून,तसेच झालेला संपर्क वाढवून ह्या शेठला सोमाटणे फाटा येथे बहिणीच्या घरी बोलावुन तेथे त्याच्यासोबत शारीरिक जवळीक करून,त्या प्रसंगाचे फोटो काढून,ते फोटो तुझ्या परिवार व नातेवाईकांना पाठवीन अशी धमकी देऊन जवळपास 27 लाख 56 हजार रुपये लुटल्याची तक्रार या पीडित सराफ व्यवसायिक शेठने कोतवाली पोलीसांत केली आहे.

       तसेच या बाईने तिच्या पतीला देखील उरुळी कांचन येथे फिर्यादी सराफ शेठच्या दुकानात कामाला लावले होते,तेथुन या बाईचा पती ह्या शेठची गाडी घेवुन आला.तसेच विविध कारणे सांगून जसे पार्लरचे दुकान टाकायचे आहे,घर घ्यायचे आहे,नवी मोपेड घेऊन द्या असे सांगून या बाईने रोख व फोन पे द्वारे 27 लाख 56 हजार रुपयांची शेठची लुबाडणुक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.म्हणुन याप्रकरणी ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर व तिच्या पतीवर गुन्हा दाखल झाला आहे