शिवप्रहार न्युज - शिर्डीत पकडलेल्या ०४ भिक्षेकरूंचा मृत्यू; ०३ पळाले...

शिवप्रहार न्युज -  शिर्डीत पकडलेल्या ०४ भिक्षेकरूंचा मृत्यू; ०३ पळाले...

शिर्डीत पकडलेल्या ०४ भिक्षेकरूंचा मृत्यू; ०३ पळाले...

अहिल्यानगर (शिवप्रहार न्युज)- श्रीराम नवमीनिमित्त शिर्डी पोलिसांनी मोहिम राबवत पकडलेल्या भिक्षेकर्‍यांपैकी चार भिक्षेकर्‍यांचा अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी ही माहिती दिली.

        दरम्यान पकडलेल्या भिक्षेकर्‍यांना विसापूर येथील बेघर गृहात ठेवण्यात आले होते. त्यातील 10 जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील एकाचा काल सोमवारी व तिघांचा आज मंगळवारी मृत्यू झाला आहे. तर दोघेजण रूग्णालयातून पळून गेले असून अन्य चौघांवर उपचार सुरू आहेत. 

     जिल्हा रुग्णालयात भिक्षेकरूंच्या मृत्यूमुळे झालेल्या गोंधळात ३ भिक्षेकरी संधीचा फायदा घेवून पळून गेले आहे.