शिवप्रहार न्युज - श्रीराम मंदिर ट्रस्ट,आयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराजांकडून “शिवहिंदुत्व” पुस्तकाचे स्वागत…
श्रीराम मंदिर ट्रस्ट,आयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराजांकडून “शिवहिंदुत्व” पुस्तकाचे स्वागत…
पुणे/श्रीरामपूर -युगप्रवर्तक,युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठरापगड जातीच्या हिंदुत्वाच्या विचारांवर आधारित असलेल्या “शिवहिंदुत्व:आदेश शिवछत्रपतींचा” या ट्रेलर पुस्तिकेचे स्वागत आयोध्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मथुरा श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आदरणीय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.तसेच गुरुवर्य स्वामी गोविंददेवगिरीजी महाराजांनी या क्रांतिकारी पुस्तकातून होणाऱ्या वैचारिक क्रांतीच्या कार्याला आशीर्वाद देखील दिला आहे.
शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी “शिवहिंदुत्व:आदेश शिवछत्रपतींचा” हे पुस्तक लिहिलेले आहे.आज दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून शिवहिंदुत्व हे पुस्तक शिवभक्तांना वाचनासाठी उपलब्ध होणार आहे.या पुस्तकाची किंमत नाममात्र 20 ₹ (छपाई खर्च) इतकी ठेवण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बिगरराजकीय व मूळ विचार या पुस्तकात मांडण्यात आलेला आहे.या पुस्तकातून शिवभक्तांना अठरापगड जातीच्या मावळ्यांचे दैवत शिवछत्रपतींचे मन वाचायला मिळणार आहे .तरी शिवभक्तांनी ना भूतो न भविष्यती अशा “शिवहिंदुत्व:आदेश शिवछत्रपतींचा” या ट्रेलर पुस्तकेच्या वाचनाचा लाभ घ्यावा व शिवछत्रपतींचे अस्सल विचार,खरे विचार, मूळ विचार,या आधी कुठेही न वाचलेले राजकारणविरहित शिवविचार समजून घ्यावे.