शिवप्रहार न्यूज - मध्यरात्री डिलिव्हरीसाठी आलेल्या गर्भवतीला कोरोना नसतांना कोरोना पॅासिटीव्ह असल्याचे खोटे सांगून उपचार केले नाही; राहुरीतील डॉ. ढुस यांचा असंवेदनशीलपणा उघड

शिवप्रहार न्यूज -  मध्यरात्री डिलिव्हरीसाठी आलेल्या गर्भवतीला कोरोना नसतांना कोरोना पॅासिटीव्ह असल्याचे खोटे सांगून उपचार केले नाही; राहुरीतील डॉ. ढुस यांचा असंवेदनशीलपणा उघड

मध्यरात्री डिलिव्हरीसाठी आलेल्या गर्भवतीला कोरोना नसतांना कोरोना पॅासिटीव्ह असल्याचे खोटे सांगून उपचार केले नाही; राहुरीतील डॉ. ढुस यांचा असंवेदनशीलपणा उघड ...

राहुरी -राहुरी तालुक्यातील मुळा नदी किनारी असणार्या पानेगाव -मांजरी भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याची कन्या असलेली एक गरोदर महिला ही गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापासून राहुरी शहरातील पाण्याच्या टाकी जवळ असणारे डॉक्टर प्रसाद ढुस यांच्या शांताई प्रसुतीगृह-हॉस्पिटलमध्ये नियमित उपचार घेत होती. डॉक्टरांनी या गर्भवती महिलेला 06 मे ही डिलीवरीची तारीख दिली होती.परंतू दिनांक 4 मे 2021 रोजी मध्यरात्री या गर्भवती महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या वडिलांनी तिला डॉक्टर ढुस यांच्या हॅास्पीटल मध्ये मोटरसायकल वरून तात्काळ उपचार व्हावे यासाठी आणले. 

             हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर तेथे डॉक्टर ढुस उपस्थित नसल्याचे तेथील नर्स ने सांगुन या नर्सने गरोदर महिलेची स्वतःच्या हाताने स्वॅब घेऊन कोरोना चाचणी केली. ही चाचणी देखील निगेटिव आली पण त्या महिलेला पॉझिटिव चाचणी आल्याचे सांगितले गेले. नर्सने डॅाक्टरला फोन लावला आणि नंतर डॉक्टर येथे ॲडमिट करुन घेणार नाही तरी तुम्ही तिला नगर येथे ऍडमिट करायला घेवुन जा असे सांगितले. महीलेच्या वडीलांना हे ऐकुन धक्का बसला कारण ज्या डॅाक्टरकडे ०९ महिन्यापासुन उपचार चालु आहे त्या डॅाक्टरने ऐन डिलेवरीच्या वेळेस डिलेवरी करण्यास नकार दिला. खरंतर यावेळी डॉक्टर यांनी ते राहत असलेल्या वरच्या मजल्यावरून खाली हॉस्पिटलमध्ये येणे आवश्यक होत व आपल्याकडे गेल्या ०९ महिन्यांपासून उपचार घेत असलेल्या गर्भवती महिलेची तपासणी करणे गरजेचे होते परंतु डॉक्टर ढुस यांनी तसे न करता नर्सला फोनवरच गर्भवती महिलेला नगर येथे ऍडमिट होण्यास सांगण्याचा सल्ला दिला. त्या गर्भवती महिलेला प्रचंड प्रसूती कळा होत असतांना देखील तेथील नर्सने सुद्धा कुठलीही माणुसकी दाखवली नाही आणि निघून जाण्यास सांगितले. 

                 त्यानंतर त्या शेतकऱ्याने आपल्या गर्भवती मुलीला मोटरसायकलवर बसून मध्यरात्री उंबरे येथील सरकारी दवाखान्यात नेले. तेथे देखील लाईट व मनुष्यबळ नसल्यामुळे काही उपचार होऊ शकले नाही अशा परिस्थितीत प्रसुती कळा सोसत रात्रभर ही गर्भवती महिला उंबरे येथील सरकारी दवाखान्यात पडून होती. त्यानंतर सकाळ झाल्यावर तिच्या वडीलांनी गर्भवती महीलेला मोटरसायकलवर बसवून पुन्हा राहुरी शहरात आणले आणि राहुरी शहरातील एका प्रसूती गृहात या महिलेची डिलिव्हरी केली.

                     परंतु या कालावधीत जो त्रास,जो मनस्ताप ,डिलेवरी च्या दिवशी ५० किमी चा मोटारसायकल प्रवास आणि जे प्रचंड हाल या प्रसुतीवेदना सहन करत असलेल्या महिलेचे व तिच्या शेतकरी वडिलांचे झाले याची कल्पना न केलेली बरी. जर डॅाक्टरच्या या नकारामुळे या महीलेच्या जिवाचे किंवा तिच्या पोटातील बाळाचे काही बरे - वाईट झाले असते तर याला जबाबदार कोण असते? सुदैवाने तसे झाले नाही परंतू जर ही गरोदर महीला शेतकरी कन्या नसती ती एखाद्या मोठ्या घरची असती तर डॅाक्टर ने असा नकार द्यायची हिंमत दाखवली असता का? 

                आज या महिलेच्या वडिलांनी “ शिवप्रहार प्रतिष्ठान” संधटनेशी संपर्क केला आणि वरील घडलेली दुःखद हकीकत सांगितली. शिवप्रहार प्रतिष्ठानकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यात आली असता असे समजले की,

०१)डॅाक्टरकडे नऊ महिन्यापासून उपचार घेत असलेल्या या गरोदर महिलेची डिलिव्हरी डॉक्टर ढुस यांनी करणे गरजेचे होते परंतु त्यांनी तसे केले नाही.

०२)तसेच डिलिव्हरीआधी कोरोना चाचणी केलीच पाहीजे असे कायद्यामध्ये कुठेही नमूद नसतांना देखील तीनशे रुपयाची चाचणी हजार रुपयांमध्ये ढुस हॉस्पिटलच्या नर्सने करून घेतली. 

०३)कोरोना निगेटिव्ह असताना सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे खोटे सांगुन प्रसूती कळा सोसत असलेल्या महिलेला 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या नगर शहरात जाण्यास सांगितले. 

०४) तसेच डॉक्टरांकडे कोरोनाचा रिपोर्ट मागितला असता त्यांनी रिपोर्ट देण्यास देखील नकार दिला. 

                  वरील सगळ्या गोष्टी ह्या मेडिकल निग्लीजन्स (निष्काळजीपणा) असून याच्या विरोधात शिवप्रहार प्रतिष्ठान या महिलेच्या वडिलांच्या माध्यमातून न्यायालयात, पोलिसांत तसेच कंजूमर प्रोटेक्शन कोर्टात तक्रार दाखल करणार आहे. तसेच डिलेवरी च्या संकटकाळात असलेल्या या गरोदर महिलेला ऐनवेळी वाऱ्यावर सोडणाऱ्या या डॉक्टरच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.