शिवप्रहार न्यूज - सुगंधी तंबाखु विक्रेत्याविरुध्द कारवाई करुन ६,२५,००० /- रु. किंचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
सुगंधी तंबाखु विक्रेत्याविरुध्द कारवाई करुन ६,२५,००० /- रु. किंचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
नगर- मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि / श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि / श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ दिनेश मोरे, संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, राहुल सोळुंके, संदीप चव्हाण,पोना/लक्ष्मण खोकले पोका /मच्छिद्र बर्डे, कमलेश पाथरुट व रणजित जाधव अशांना बोलावुन घेवुन फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथक तात्काळ रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नगर शहर व तालुका परिसरात फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना पोनि / श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दोन इसम वडगांव गुप्ता ते पिंपळगाव माळवी रोड, बायपास चौकात जितो मालवाहू टेम्पोत सुंगधी तंबाखु चोरुन विक्री करण्यासाठी येणार आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि अनिल कटके यांनी पथकास नमुद माहिती कळवुन पंचांना सोबत घेवुन बातमीतील नमुद टिकाणी जावून खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. पथकाने पंचांना सोबत घेवुन वडगांव गुप्ता ते पिंपळगाव माळवी रोडने जावुन बायपास चौकात सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील नमुद जितो टेम्पो येताना दिसला पथकाची खात्री होताच टेम्पो चालकास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्याने ताब्यातील जितो टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला. त्यावेळी टेम्पोमध्ये दोन इसम बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे ९) सौरभ मुकूंद धामनगांवकर वय ३० व २) सलमान अहमद शेख वय ३०, दोन्ही रा. गोविंदपुरा, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांना टेम्पोमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीस समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यांना अधिक विश्वासात घेवून बारकाईने विचारपुस करता त्यांनी टेम्पोमध्ये सुगंधी तंबाखु असले बाबत माहिती दिली.
सदर इसमांचे ताब्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला विविध प्रकारचा २,२५,०००/-कि.ची सुगंधी तंबाखु पांढ-या रंगाच्या १५ गोण्या तसेच ४,००,०००/- रुपये किंमतीचा महिंद्र कंपनीचा जितो मॉडेलचा टेम्पो असा एकुण ६,२५,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्यांना सुगंधी तंबाखु मालका बाबत विचारणा करता त्यांनी इसम नामे ३) झाहिद ऊर्फ जावेद खान, रा. गोविंदपुरा, अहमदनगर यांचे मालकिची असुन विक्री करणे करीता घेवुन जात असले बाबत सांगितल्याने झाहिद ऊर्फ जावेद कदीर खान वय ३१ रा. गोविंदपुरा मुकुंदनगर अहमदनगर याचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने सदर तिघांना ताब्यात घेवुन एमआयडीसी पो.स्टेला पोकों/२५०३ कमलेश हरिदास पाथरूट ने. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४६ / २०२३ भाविक १८८, २७२, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. आण्णासाहेब जाधव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.