शिवप्रहार न्यूज- पुर्वीप्रमाणे... श्री.साईबाबांच्‍या दर्शनासाठी आलेल्‍या भाविकांचे गंधाचा टिळा लावून स्‍वागत…

शिवप्रहार न्यूज- पुर्वीप्रमाणे... श्री.साईबाबांच्‍या दर्शनासाठी आलेल्‍या भाविकांचे गंधाचा टिळा लावून स्‍वागत…

पुर्वीप्रमाणे... श्री.साईबाबांच्‍या दर्शनासाठी आलेल्‍या भाविकांचे गंधाचा टिळा लावून स्‍वागत…

शिर्डी –

              श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आज दिनांक २९ ऑक्‍टोबर रोजी पहाटेच्‍या काकड आरतीपासुन पुर्वीप्रमाणे श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी आलेल्‍या प्रत्‍येक साईभक्‍तांना गंधाचा टिळा लावून स्‍वागत करण्‍याचा शुभारंभ करण्‍यात आला असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

              श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी आलेल्‍या प्रत्‍येक साईभक्‍तांचं स्वागत गंधाचा टिळा लावून करण्‍याचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीने घेतला होता. त्‍यानुसार श्रींच्‍या दर्शनासाठी येणा-या प्रत्‍येक साईभक्‍तांचे गंध टिळा लावून स्‍वागत करण्‍यात येत होते. परंतु गेल्‍या दोन वर्षापुर्वी म्‍हणजेच सन २०२० साली संपूर्ण जगभरात व देशभरात कोरोना व्‍हायरसने थैमान घातला. या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे भारत सरकार व राज्‍य शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले. यामध्‍ये धार्म‍िक स्‍थळे, सामाजिक ठिकाणी गर्दी होऊ नये, अथवा करु नये, असे निर्देश देण्‍यात आलेले होते. त्‍याच पार्श्‍वभूमीवर दिनांक १७ मार्च २०२० रोजी पासुन श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरीता बंद ठेवण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या वतीने घेतला होता. त्‍यानंतर सन २०२१ मध्‍ये कोरोना विषाणुच्‍या प्रमाणात घट झाल्‍याने राज्‍य शासनाच्‍या वतीने कोरोनाचे नियम शिथिल करण्‍यात आल्‍यामुळे दिनांक ०७ ऑक्‍टोंबर २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले होते. तसेच कोरोना विषाणुच्‍या प्रतिबंधत्‍माक उपाय म्‍हणून बंद केलेल्‍या सोयी- सुविधा संस्‍थानच्‍या वतीने टप्‍याटप्‍याने खुली करण्‍यात आल्‍या.

             त्‍याच अनुषंगाने आज दिनांक २९ ऑक्‍टोबर २०२२ रोजी पहाटेच्‍या काकड आरतीपासुन पुर्वीप्रमाणे श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी आलेल्‍या प्रत्‍येक साईभक्‍तांना गंधाचा टिळा लावून स्‍वागत करण्‍याचा शुभारंभ करण्‍यात आला.