शिवप्रहार न्यूज - निळवंडे धरणातून बुधवारी पाणी सोडण्याची चाचणी...
निळवंडे धरणातून बुधवारी पाणी सोडण्याची चाचणी...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- उतर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाकालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या उपस्थीतीत बुधवार दि. 31 मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहीती महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक क्षण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे धरणाच्या कार्यस्थळावर जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी अधिकारी यांची बैठक घेवून 31 तारखेच्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भात आढावा घेतला. 31 मे रोजी सकाळी 10 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या स्थळाची पाहाणी करून त्यांंनी सूचना केल्या. येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही दौरा होण्याची शक्यता लक्षात घेवून त्याचेही नियोजन आतापासूनच सुरू करण्याबाबतही मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले.
याप्रसंगी माजी आमदार वैभवराव पिचड जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे अभियंता अरूण नाईक, पोलीस उपअधिक्षक नारायण वाघचौरे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे, कृषी विभागाचे गायकवाड भाजपाचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, महिला जिल्हाध्यक्षा व अकोलेच्या नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, माजी सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, अरुण शेळके, आप्पासाहेब आवारी, आनंदराव वाकचौरे, राजेंद्र डावरे, बाळासाहेब सावंत, भाऊसाहेब कासार, महिलाध्यक्षा रेश्माताई गोडसे, यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे यांंनी बैठकीमध्ये कालव्याच्या कामाचा आढावा घेवून चाचणी झाल्यानंतर यातील त्रृटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी काही प्रलंबित काम मार्गी लावण्याबाबत केलेल्या सूचनांची तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही मंत्री विखे पाटील यांनी दिले. धरणासाठी जमीनी गेलेल्या शेतकऱ्यांना गायरान जमीनी देण्यात आल्या होत्या या जमीनीच्या बाबतीत अद्यापही प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित असल्याने याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करून पाठविणाच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना दिल्या याबबात धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर घेवून न्याय मिळवून देण्याची ग्वाही मंत्री विखे यांनी दिली. धरणाच्या उजव्या कालव्याचे कामाची माहीती त्यांनी जाणून घेतली.ही काम पूर्ण होण्यास तीन महीन्याचा कालावधी लागणार असला तरी दोन महीन्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवूनच ही काम पूर्ण करण्याबात विभागाने कार्यवाही करावी असे त्यांनी स्पष्ठ केले.
धरणाच्या कामाबाबत कोण काय बोलतो यापेक्षा आता लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची इच्छा पूर्ण होत आहे याला माझ्या दृष्टीने महत्व आहे.शेतकऱ्यांचा त्याग आणि त्या त्या वेळच्या सरकारने निर्णय करून धरणाचे कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी निर्णय घेतल्यामुळेच आता पाणी देण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवता येणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.