शिवप्रहार न्यूज-लॅाकडाऊन मध्ये नगर जिल्ह्यातील ४६१ जणांनी काढला घरी बसुन दारु पिण्याचा ॲानलाईन परवाना; ४६७ पैकी फक्त ०६ मद्यपींचे अर्ज झाले नामंजूर. शासनाला लाखोंचा महसुल मिळाला

लॅाकडाऊन मध्ये नगर जिल्ह्यातील ४६१ जणांनी काढला घरी बसुन दारु पिण्याचा ॲानलाईन परवाना; ४६७ पैकी फक्त ०६ मद्यपींचे अर्ज झाले नामंजूर.
शासनाला लाखोंचा महसुल मिळाला...
नगर- सर्वसामान्यांनी मोठे प्रयत्न करुन देखील कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी शासनाचा इ-पास लवकर मिळत नाही.काहीतरी त्रुटी काढुन अनेकांचे इ-पास रद्द केले गेल्याच्या तक्रारी नागरिक करतात. पण दुसरीकडे मात्र नगर जिल्हयात दारु पिण्याचा परवाना मिळण्यासाठी आलेल्या ४६७ पैकी ४६१ अर्ज मंजूर झाले असुन फक्त ०६ अर्ज नामंजूर झालेले दिसत आहे.
सध्या राज्यात लागू असलेले लॅाकडाऊन आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात मद्यविक्री बंद झाली आहे.मात्र ऑनलाईन दारु खरेदी सुरु असल्याने त्यासाठी मद्यप्राशन परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. हा परवाना नसल्यास मद्यपींना ॲानलाईन दारु मागवता येत नाही. त्यामुळे मद्यपींनी आता मद्य प्राशन परवाना काढण्यात पसंती दिली आहे. जानेवारी ते एप्रिलअखेर जिल्ह्यातील ४६१ जणांनी ऑनलाईन पद्धतीने मद्यप्राशन परवाना काढला आहे. यात १४४ जणांनी एक वर्षासाठी तर ३१७ जणांनी थेट आजीवन म्हणजे जिवंत असेपर्यंत मद्यप्राशन परवाना काढण्यास पसंती दिली आहे. यातून तीन लाख ३६ हजार १३५ रुपयांचा महसूल शासनाला जमा झाला असल्याचे समजते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यभरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.त्यात मद्य विक्री देखील बंद करण्यात आली आहे. यामुळे मद्यपींचे हाल सुरु झाले होते.दरम्यान शासकीय तिजोरीत भर पडावी यासाठी ऑनलाईन मद्यविक्री करण्यास १८ वर्षावरील व्यक्तीस परवानगी देण्यात येत आहे. तसेच “स्टॅंडर्ड तळीराम” याचा लाभ घेतल्याशियाय राहणार नसल्याचे बोलले जात आहे.