शिवप्रहार न्यूज- टाकळीभान मध्ये ठेकेदाराचा गलथान कारभार;नुसतेच खोदून ठेवल्यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड हाल…

टाकळीभान मध्ये ठेकेदाराचा गलथान कारभार;नुसतेच खोदून ठेवल्यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड हाल…
टाकळीभान- टाकळीभान गावामध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चालू आहे. या रस्त्याच्या कडेला रुंदीवाढ होण्यासाठी दहा फूट परिसर आठवडाभरापासून खोदून ठेवण्यात आला असून त्यामुळे व्यावसायिकांकडे येणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत असून गिराईक कमी आल्यामुळे व्यापाऱ्यांचे देखील आर्थिक हाल होत आहे.
तसेच रस्ता खोदून ठेवल्यामुळे रुंदी कमी झाली असून त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होत आहे.तरी बांधकाम विभागाने/ठेकेदाराने रस्त्याचे काम नागरिकांचे हाल होईल असे आठवडाभर बंद ठेवु नये. लवकरात लवकर या रस्त्याचे काम करून घ्यावे व कोरोना मधून सावरलेल्या व्यवसायिक वर्गाला दिलासा द्यावा.