शिवप्रहार न्यूज- महावितरण विरोधातील अर्ध जलसमाधी आंदोलनाला पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचा चोख बंदोबस्त…

शिवप्रहार न्यूज- महावितरण विरोधातील अर्ध जलसमाधी आंदोलनाला पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचा चोख बंदोबस्त…

महावितरण विरोधातील अर्ध जलसमाधी आंदोलनाला पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचा चोख बंदोबस्त…

 श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगाव भागात गोदावरी नदी पात्रात शेतकरी संघटनेच्या बांधवांच्या वतीने महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात आज मंगळवार दि.14 डिसेंबर 2021 रोजी अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.तरी महावितरण विरोधात चालू असलेल्या या शेतकरी आंदोलनाकरिता श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

         यामध्ये सहायक फौजदार श्री. गायमुखे,पोलीस हवालदार श्री.शिंदे, हवालदार श्री.हबीब, हवालदार श्री.शेख ,पोलीस नाईक श्री.लोढे,श्री.पवार,श्री.वैरागर व श्री.कराळे इत्यादी पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून पोलिस निरीक्षक श्री.साळवे हे स्वतः नदीपात्रामध्ये बोटीच्या सहाय्याने गस्त करत आहे.कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता ते घेत आहेत.

        तसेच याबाबत अधिक माहिती अशी की,महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून महावितरणच्या काही अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकरी वर्गात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे.