शिवप्रहार न्यूज - राहाता व कोपरगांव परिसरात अवैध गावठी हातभट्टी ठिकाणी छापे टाकुन ०३ आरोपीविरुध्द कारवाई….
राहाता व कोपरगांव परिसरात अवैध गावठी हातभट्टी ठिकाणी छापे टाकुन ०३ आरोपीविरुध्द कारवाई….
नगर- मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सहा. फौज/ भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, पोना/ शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, राहुल सोळुंके, पोकों/ रणजित जाधव यांचे पथक तयार करुन राहाता पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी दिनांक १८/०१/२०२३ रोजी राहाता व कोपरगांव परिसरात मिळालेल्या माहितीवरुन खालील प्रमाणे वेगवेगळया ठिकाणी छापे टाकण्यात आले असून एकुण १,०६,०००/- रुपये किमतीचा मुद्येमाल त्यामध्ये १९०० लि. गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व ११० लि. गावठी
हातभट्टीची दारू जप्त केले.
महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये खालील प्रमाणे ०३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
आरोपीचे नांव
हिरामण साहेबराव पवार रा. ३४,०००/- रु. ६०० लि. कच्चे रसायन व वारी ता. कोपरगांव ४० लि. गावठी दारु
अ.नं. पोलीस ठाणे गुरनं व कलम राहाता पो.स्टे. ३१/२०२३ महा.
१२३
प्रो. अॅ.क. ६५ (फ) (ई)
राहाता पो.स्टे. ३२/२०२३ महा.
प्रो. अँ.क. ६५ (फ) (ई) राहाता पो.स्टे. ३३/२०२३
प्रो. अॅ.क. ६५ (फ) (ई)
दयानंद वामन गायकवाड रा.
वारी ता. कोपरगांव
महा. म्हाळू जयराम बड़े रा. शिंगवे २७,०००/- रु. ५०० लि. कच्चे रसायन व ता. राहाता
४५,०००/- रु.८०० लि. कच्चे रसायन व ५० लि. गावठी दारु
२० लि. गावठी दारु
सदरची कारवाई मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील साो. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. संजय सातव सो., उप विभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.