शिवप्रहार न्यूज- मुल्ला कटरसह चौघांवर ४० वर्षे वयाच्या महिलेवर बलात्कार केल्याचा अजुन एक नवीन गुन्हा काल दाखल…
मुल्ला कटरसह चौघांवर ४० वर्षे वयाच्या महिलेवर बलात्कार केल्याचा अजुन एक नवीन गुन्हा काल दाखल…
श्रीरामपूर /प्रतिनिधी -श्रीरामपूर शहरात वार्ड नंबर दोन मधील आरोपी इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर याच्याविरुद्ध धर्मांतर बळजबरीने निकाह शाळेतून विद्यार्थिनीला पळविणे, बलात्कार करणे असे गंभीर गुन्हे दाखल झालेले असताना काल पुन्हा घाबरलेल्या पीडित 40 वर्षे वयाच्या गरीब महिलेने तिच्यावरही आरोपी मुल्ला कटर याने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिचे विरुद्ध बळजबरीने बलात्कार केला.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून मुल्ला कटर /इमरान कुरेशी ,गुफरान निसार शेख,आशु लियाकत पठाण,पप्पू गोरे ,सर्व राहणार -वाड नंबर 2,श्रीरामपूर यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात बलात्कार ,अनुसूचित जाती जमाती ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुल्ला कटर आधीपासूनच अटकेत आहे.इतर आरोपींचा डीएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शोध घेत आहेत.घटनास्थळी डीएसपी मिटके, पो.नि. गवळी यांनी भेट दिली.
मुल्ला कटरचे प्रकरण थेट विधानसभेत गाजले.उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच पो.नि. सानप यांना निलंबित केले त्यांची आता पुढील चौकशी सुरू आहे.
आरोपींना कोण मदत करतं याचा शोधही आता पोलीस घेत आहेत.पुन्हा एक स्री अत्याचाराचा मुल्ला कटर व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाल्याने श्रीरामपूर शहरात किती भयानक अत्याचाराचे प्रकार सुरू होते हे उघड झाले आहे.मुल्ला कटर/इमरान कुरेशीची वार्ड नंबर दोन मध्ये मोठी दहशत होती.