शिवप्रहार न्यूज - शिवप्रहारच्या मावळ्यांमुळे उल्हासनगरच्या आईची चार महिन्यानंतर ०२ वर्षाच्या बाळासोबत श्रीरामपुरच्या घुमनदेवला झाली भेट…

शिवप्रहारच्या मावळ्यांमुळे उल्हासनगरच्या आईची चार महिन्यानंतर ०२ वर्षाच्या बाळासोबत श्रीरामपुरच्या घुमनदेवला झाली भेट…
श्रीरामपूर- उल्हासनगर येथे राहणारी सौ.ज्योती दादाभाऊ अहिरे या महिलेचे तिच्या पतीसोबत घरगुती वाद झाल्यामुळे गेल्या चार महिन्यापासून महिलेची पती व मुलगा-मुली सोबत भेट झाली नव्हती.वाद झाल्यापासुन पती नेमका कुठे आहे ? हेच या महिलेला माहीत नव्हते.
दरम्यान काल तिला कळाले की,तिचा पती हा श्रीरामपूर परिसरात ऊस तोडी करत आहे.त्यामुळे ही महिला तिची आई गीता जाधव व काका संतोष यांच्यासह उल्हासनगर कल्याण इथून निघून श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्टेशन येथे दाखल झाली.काल रात्रीच्या सुमारास त्यांनी बाळाची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला.परंतु हा प्रकार सिविल मॅटर असल्यामुळे श्रीरामपूर पोलिसांकडून त्यांना मदत होऊ शकली नाही.म्हणून श्रीरामपूर शहरातील रिक्षाचालक श्री.लोंढे दादा यांनी नमुद महिलेला व तिच्या परिवाराला आज बुधवारी 28 डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. बेलापूर रोड ,बजरंगनगर येथील “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या कार्यालयात आणले.
शिवप्रहार कार्यालयात आल्यावर माजी पोलीस अधिकारी श्री.सुरजभाई आगे यांनी सदर महिलेकडुन या प्रकरणाची व्यवस्थित माहिती घेतली व आई आणि ०२ वर्षाच्या बाळाची भेट घडवून आणण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू झाले.काही तासांच्या संपर्कानंतर या महिलेचा नवरा दादाभाऊ अहिरे हा घुमदेव परिसरात ऊसतोड करीत असल्याचे समजले.त्यानुसार कामगार ऊसतोड करीत असलेल्या ठिकाणी जाऊन या महिलेची व तिच्या दोन वर्षाच्या बाळाची भेट घडवून आणण्यात आली.सोबत ७-८ वर्षांची मुलगी देखील आईला भेटली.०४ महिन्यानंतर आपल्या दोन वर्षाच्या बाळाची भेट झाल्यामुळे या महिलेचे डोळे पाणावले होते.
लहान बाळाकडे पाहून या नवरा- बायकोने वाद मिटवुन एकत्र यावे अशी यावेळी सर्वांनी भूमिका मांडली.या भेटी करता शिवप्रहार प्रतिष्ठानचे मावळे राजू पाटील बोडके, गौरव चितळे ,राहुल मते,ललित अस्वले यांच्यासह घुमदेवचे स्थानिक ग्रामस्थ सय्यद, रिक्षा चालक श्री लोंढे दादा यांची मदत झाली.शिवप्रहार चे कार्याध्यक्ष चंद्रशेखर(चंदू)आगे यांनी याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे श्री.प्रशांत रणवरे यांना संपर्क केला असता त्यांनी देखील सहकार्य केले.