शिवप्रहार न्यूज- पोनि. दिलीप पवार यांना उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रकडुन पुरस्कार… 

शिवप्रहार न्यूज- पोनि. दिलीप पवार यांना उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रकडुन पुरस्कार… 

पोनि. दिलीप पवार यांना उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रकडुन पुरस्कार… 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना युनियन होम मिनिस्टर मेडल फॉर 'एक्सलन्स इन इन्व्हेस्टीगेशन फॉर - २०२२' हा पुरस्कार देण्यात आला आहे. दिलीप पवार यांनी लोणावळा ग्रामीण येथे डॉ. हिरालाल जगन्नाथ खळब खंडेलवाल यांच्या बंगल्यावर २०२१ साली पडलेल्या दरोड्याचा उत्कृष्ट तपासासाठी हा पुरस्कार मिळाला.

         देशभरातील ७५ पोलीस अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला असून त्यात महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश असून त्यात दिलीप पवार हे एक आहेत. दिलीप पवार हे यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक होते.तसेच नगर एलसीबीचेही ते काहीकाळ प्रमुख होते. त्याकाळी जिल्हयातील गुन्हेगारी टोळयांवर त्यांनी केलेली कारवाई गाजली होती. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.