शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर-बेलापूरचे भूमिपुत्र स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांना महाराष्ट्र शासनाचा”ज्ञानोबा-तुकाराम" पुरस्कार जाहीर...

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर-बेलापूरचे भूमिपुत्र स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांना महाराष्ट्र शासनाचा”ज्ञानोबा-तुकाराम" पुरस्कार जाहीर...

श्रीरामपूर-बेलापूरचे भूमिपुत्र स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांना महाराष्ट्र शासनाचा”ज्ञानोबा-तुकाराम" पुरस्कार जाहीर...

श्रीरामपूर -श्रीरामपूर -बेलापूरचे भूमिपुत्र व आयोध्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष तसेच श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट,मथुराचे विश्वस्त स्वामी श्री.गोविंददेवगिरी जी महाराज यांना महाराष्ट्र शासनाचा 2021-22 सालचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार नुकताच जाहीर झाला.

      स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या आध्यात्म क्षेत्रातील गौरवशाली कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आला.मागच्या वर्षी स्वामी गोविंददेवगिरीजी महाराजांनी इंडोनेशिया येथे आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे व हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करून स्वामी विवेकानंद यांचा सुवर्णमयी वारसा पुढे नेला.

     लाखो भाविक-भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने श्रीरामपूर व बेलापूर परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.गुरुवर्य स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने देखील आनंद उत्सव साजरा करण्यात आला.