शिवप्रहार न्यूज - मोटार सायकल आडवुन दाम्पत्यास चाकुचा धाक दाखवुन लुटणारी टोळी जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
मोटार सायकल आडवुन दाम्पत्यास चाकुचा धाक दाखवुन लुटणारी टोळी जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
नगर-प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 03/02/2023 फिर्यादी श्रीमती. कांचन रविंद्र घोरपडे, वय 24, रा. अस्तगाव, ता. राहाता या त्यांचे पती श्री. रविंद्र घोरपडे असे मोटार सायकलवर देहरे गांवचे शिवारातुन रस्त्याने जात असतांना फिर्यादी यांचे पती यांनी मोटार सायकलची हवा तपासण्यासाठी थांबलेले असतांना दोन मोटार सायकलवर अनोळखी चार इसम येवुन फिर्यादीचे पतीस मारहाण करु लागले. त्यावेळी फिर्यादीने जोरजोरात आरडा ओरडा करण्यास सुरुवात केल्याने आरोपीने फिर्यादीची हाताची बोटे पिरगळुन चाकुचा धाक दाखवुन फिर्यादीचे पती रविंद्र घोरपडे यांचे खिशातील 5,000/- रुपये रोख घेवुन गेले आहे. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. 95/2023 भादविक 394, 34 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्ह्याचा समातंर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकॉ/योगेश सातपुते, मेघराज कोल्हे यांचे पथक नेमून तपासाबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पथक आरोपीची माहिती घेत असतांना पोनि/अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा कडुन माहिती मिळाली की, आरोपी नामे अंबादास खेमनर याने त्याचे साथीदारासह सदर गुन्हा केला असुन तो मोमीन आखाडा, राहुरी येथे त्याचे राहते घरी असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी पथकास नमुद माहिती कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथकास लागलीच रवाना केले. पथक मोमीन आखाडा, ता. राहुरी येथे जावुन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेवुन सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम येतांना दिसला पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले व त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) अंबादास अशोक खेमनर, वय 22, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत चौकशी करता सुरुवातीला तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन कसुन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांचे मदतीने केल्याची कबुली दिली. त्यास साथीदारांची नावे विचारता त्याने नागेश्वर चव्हाण, रा. मोमीन आखाडा, राहुरी असे सांगितले. त्याचा राहते घरी जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 2) नागेश्वर संजय चव्हाण, वय 20, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी असे सांगितले. त्याचे तिसरे साथीदारास ताब्यात घेतले तो अल्पवयीन असल्याने निष्पन्न झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कायदेशिर कारवाई करीता एमआयडीसी पोस्टे येथे हजर केले असुन पुढील कारवाई एमआयडीसी पोस्टे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.