शिवप्रहार न्यूज - 11 दिवसांच्या चिमुकल्याचा बापाने दाबला गळा
11 दिवसांच्या चिमुकल्याचा बापाने दाबला गळा
नगर(शिवप्रहार न्युज)- लग्नानंतर पती-पत्नीला मुलगा होईल का मुलगी हे कोणीही सांगू शकत नाही, असे असताना पारनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे राहणारा विवाहित तरुण नराधम बाप अक्षय रामदास सुपेकर, वय वर्ष-32 याच्या बायकोला ती बाळंत होऊन एक मुलगा झाला तेव्हा अक्षय सुपेकर हा बायकोच्या माहेरी गेला तेथे त्यांनी जन्मलेले अकरा दिवसाचे बाळ पाहिले. हे बाळ थोडेसे तोंडात व्यंग असल्याचे त्याने पाहिले. तो त्याच्या बायकोला व सासूला म्हणाला की, मी या बाळाला फिरून आणतो.
असे म्हणून अक्षय रामदास सुपेकर यांनी अकरा दिवसाच्या त्याच्याच बाळाला घेऊन जाऊन त्याचा गळा दाबून खून केला. या प्रकरणी वरीलप्रमाणे आरोपी अक्षयची सासू मंदाबाई भास्कर पवार, रा.पोखरी हिने पारनेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी जावई अक्षय रामदास सुपेकर याच्याविरुद्ध भादंवी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बळक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अक्षय सुपेकरला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.