शिवप्रहार न्युज - आंतरावली,जालना अत्याचाराची जबाबदारी स्वीकारून तिघाडी सरकार बरखास्त करा-सकल मराठा समाज श्रीरामपूरची मागणी…
आंतरावली,जालना अत्याचाराची जबाबदारी स्वीकारून तिघाडी सरकार बरखास्त करा-सकल मराठा समाज श्रीरामपूरची मागणी…
श्रीरामपूर-जालना जिल्ह्यातील अंतरावली येथे मराठा आरक्षण व इतर मुद्द्यांकरता आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील महिला,पुरुष व लहान मुलांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या लाठी हल्ल्यामुळे अनेक जण जखमी झाले.त्या घटनेचा निषेध म्हणून आज शनिवार दि.०२ सप्टेंबर २०२३ रोजी सकल मराठा समाज,श्रीरामपूरच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,श्रीरामपूर येथे प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जालना अंतरावली येथील घटनेची जबाबदारी सरकारने स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व तिघाडी सरकार बरखास्त करावे अशी या निवेदनात मागणी करण्यात आली आहे.तसेच हल्ला करण्याचा आदेश कुणी दिला त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी करण्यात आली.
यावेळी निवेदनात देतांना मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. “शिवप्रहार प्रतिष्ठान” संघटना देखील या घटनेचा जाहीर निषेध करत
आहे.