शिवप्रहार न्यूज- अक्षयकुमार साईचरणी; चाहत्यांची गर्दी

अक्षयकुमार साईचरणी; चाहत्यांची गर्दी
शिर्डी (शिवप्रहार न्युज)- प्रसिद्ध सिनेअभिनेता अक्षयकुमार याने आज शिर्डीमध्ये येवून श्रीसाईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. अक्षयकुमार याचे साईमंदिरात आगमन होताच उपस्थित असणाऱ्या साईभक्तांना त्याने हात वर करून अभिवादन केले. त्यानंतर त्याने मंदिरात जाऊन बाबांच्या समाधीचे हात जोडून तसेच डोके टेकवून मनोभावे दर्शन घेतले.
त्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी साईबाबांची मूर्ती भेट देत अक्षयकुमार याचे स्वागत केले. अक्षयकुमार साईबाबांच्या दर्शनासाठी आल्याची माहिती कळाल्यानंतर दुपारी मंदिर परिसरात अक्षयच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.