शिवप्रहार न्यूज - गौणखनिज वाहतुकधारकांनी ग्राहकांना वाळू पोहोच करण्यासाठी नोंदणी करण्याचे अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…
गौणखनिज वाहतुकधारकांनी ग्राहकांना वाळू पोहोच करण्यासाठी नोंदणी करण्याचे अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…
नगर दि. 13 मे (जि.मा.का.वृत्तसेवा):- नवीन वाळु धोरणाच्या अनुषंगाने वाळू डेपोपासून ग्राहकांच्या स्वखर्चाने त्यांच्या इच्छुक ठिकाणी वाळू पोहोच करण्यासाठी सहा चाकीपर्यंत सर्व गौणखनिज वाहतूक धारकांनी नोंदणी करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाळु उत्खनन व वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. नवीन वाळु धोरणानुसार वाळु डेपोपासुन ग्राहकांना स्वखर्चाने त्यांच्या इच्छुक ठिकाणी वाळु पोहोच करण्यात येणार आहे.
ग्राहकांना वाळु पोहोच करण्यासाठी सहा चाकीपर्यंत सर्व गौण खनिज वाहतुकदार यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोंदणी करावी. वाहतुकीचे दर प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर यांनी निश्चित केल्यानुसार राहतील याची नोंद घ्यावी. तसेच याबाबतची सविस्तर माहिती www.nic ahmednagar.com या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.