शिवप्रहार न्यूज - औरंगाबाद नावाचा आग्रह धरणे म्हणजे राष्ट्रनिष्ठेला दुय्यम ठरवत धार्मिक कट्टरतेचा उघड पुरस्कार-

शिवप्रहार न्यूज - औरंगाबाद नावाचा आग्रह धरणे म्हणजे राष्ट्रनिष्ठेला दुय्यम ठरवत धार्मिक कट्टरतेचा उघड पुरस्कार-

औरंगाबाद नावाचा आग्रह धरणे म्हणजे राष्ट्रनिष्ठेला दुय्यम ठरवत धार्मिक कट्टरतेचा उघड पुरस्कार-

      

छ.संभाजीनगर- मागच्या काही दशकांपासून औरंगाबाद या राज्यातील मेगा सिटी पैकी एका प्रमुख शहराच्या नामांतराचा विषय कायम चर्चेचा ठरला होता.औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे अशी आग्रही भूमिका शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने घेतली होती.औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर असे करावे ही लाखो शिवप्रेमी, शंभूप्रेमींची अनेक वर्षांपासूनची आग्रही मागणी होती.

     औरंगाबाद या नावाला आक्षेप असण्याची अनेक कारणे आहेत.औरंगाबाद हे या शहराचे स्थापनेपासूनचे मूळ नाव नव्हे.खडकेश्वरावरून पडलेले खडकी हे खरे तर या ठिकाणचे मूळ गाव. याखेरीज औरंगजेब हा स्वराज्याचा प्रमुख शत्रू होता ही या राज्यातल्या जनतेच्या मनामनातली भावना आहे. औरंगजेबाच्या राजवटीत अन्याय,जुलुम,अत्याचार आणि मुस्लिम कट्टरवादाने कहर केलेला होता.अर्थातच औरंगजेब हा शासक म्हणून नव्हे तर शोषक म्हणून काम करणारा राज्यकर्ता होता. रयतेचा कमालीचा छळ,शोषण,मुस्लिम धर्म अनुनयाची जोर जबरदस्ती ही औरंगजेबाची कार्यपद्धती.धर्मवेडा असलेल्या औरंगजेबाने स्वतः चा बाप आणि मुलांचा सुद्धा क्रूरपणे जीव घेतला. छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून त्यांची नखे उपसली,कातडी छिणली,डोळ्यात गरम सळ्या खूपसल्या,नाकात-कानात गरम शिसं ओतलं.छत्रपती संभाजी राजांची अशी हत्या अमाणूषतेचा कळस होती. एकीकडे अफजलखाना सारख्या बलाढ्य शत्रूची मृत्यूनंतर कबर रचून शत्रूचाही आदर करणारी छत्रपती शिवरायांची संस्कृती कुठे आणि ही औरंग्याची अतिरेकी वृत्ती कुठे!

      औरंगजेबासारख्या क्रूर शोषकांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी न भूतो न भविष्यती असा लढा उभारून स्वराज्याची निर्मिती केली, इतिहास रचला.दोन्ही छत्रपतींनी रयतेचे कल्याण हाच धर्म माणला.स्वतःचा हिंदू धर्म आणि सर्वच धर्मीयांचे हित जोपासले. इथल्या प्रत्येक सामान्य घटकाला स्वतःचं आपलं वाटणारं स्वराज्य निर्माण केले.खऱ्या अर्थाने रयतेचे कल्याणकारी राज्य काय असतं याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वराज्य.हा या महाराष्ट्राचा ज्वलंत, जाज्वल्य इतिहास आहे.या इतिहासाचा इथल्या मातीशी नाळ असणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटतो आणि वाटलाच पाहिजे.

    दुसरीकडे याच स्वराज्याचा शत्रू औरंगजेब याबद्दल प्रत्येक मावळ्याच्या मनात एक प्रकारची घृणा, द्वेष हा रक्तात भिणलेला आहे.असे असतानाही याच स्वराज्यातल्या एका मोठ्या शहराला क्रूरकर्मा औरंगजेबाचे नाव असणे हे हे शल्य इथल्या प्रत्येकाच्या मनात वर्षानुवर्षे घर करून होते.जुल्मी,धर्मांध औरंगजेबाचा उदो उदो का करावा? इथल्या मुसलमानांनीही फक्त तो मुस्लिम होता म्हणून त्याचे उदात्तीकरण करावे का? खरे तर या मातीशी प्रामाणिक असणारा मग तो कोणत्याही धर्माचा असो हे न पचणारेच!

     _*म्हणूनच जुलमी,धर्मांध,धर्मवेड्या औरंगजेबाच्या नावाचा लौकिक सांगणारे,लौकिक वाढवणारे प्रतिके आम्हाला नकोच ही इथल्या मातीतल्या तमाम मावळ्यांची भावना रास्त ठरते.आणि या भावनेला न्याय देण्याच्या भूमिकेतून औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजी नगर करण्यात आले.अतिशय स्वागतार्ह असा हा निर्णय.छत्रपती संभाजी महाराज या महापराक्रमी,विद्वान,चारित्र्यसंपन्न योद्धाचे नाव या शहरास दिल्याने शहराची शान कित्येक पटीने वाढली आहे.*_

       मात्र याच स्वराज्य भूमीत इथल्या मातीशी गद्दारी सांगणारी प्रवृत्तीही जिवंत असल्याचे तेवढेच ठळकपणे पुढे आलेले आहे.या प्रवृत्तीने छत्रपती संभाजीनगर या नावास विरोध दर्शवत औरंगाबाद नावाचे जाहीर समर्थन केले आहे.विशेष म्हणजे या प्रवृत्तीचे म्होरके इथल्या राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणारे आहेत ही फार मोठी शोकांतिका आहे.

      जुलूम,जबरदस्ती, अत्याचार,धर्मांधपणा याचा अतिरेक करणाऱ्या औरंगजेबाच्या नावाचे जाहीरपणे समर्थन करून त्याच्या नावासाठी आंदोलन आणि आंदोलनात औरंगजेबाची पोस्टर्स झळकवणे,औरंगजेबाच्या नावासाठी चिथावणीखोर,पेटवणारी भाषा,भाषणे रोज सुरू आहेत,ही बाब अतिशय संतापजनक,गंभीर व चिंता करायला लावणारी आहे.औरंगजेब जुलमी,अत्याचारी असला तरी तो आमच्या धर्माचा होता म्हणून आम्ही त्याचीच री ओढणार,ही तर अतिरेकी वृत्ती आणि निव्वळ धर्मवेडेपणा झाला.आमच्या धर्माचा माणूस कसाही असला तरी आम्ही जाहीरपणे त्याचे समर्थन करू अशी भूमिका धर्माने मुस्लिम असलेले व सर्व धर्मीयांच्या मतांनी निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते उघडपणे घेत आहेत ही बाब दिसते तेवढी साधीसुधी नाही.इस्रायल मध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीने देशनिष्ठेला दुय्यम ठरविणारी भाषा केल्यानंतर तिथल्या आर्मीने त्या अभिनेत्रीला जाहीररित्या गोळी घालून आमच्या मातीत असा देशद्रोह चालणार नाही याचा सबक घालून दिला.इथे मात्र औरंगजेबाच्या धर्मांध,धर्मवेड्या वाररसदारांचा राजरोसपणे नंगानाच चालू आहे.

     *देशातल्या जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत चहूबाजूच्या शत्रूंना आपल्या पराक्रमाच्या जोरावर नामोहरम करीत कल्याणकारी राज्यकारभार करणारे राज्यकर्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला थेट विरोध आणि देशातील जनतेची लूट,अन्याय,जोर,जबरदस्ती करणारा धर्मांध क्रूरकर्मा औरंगजेबाच्या नावाचे समर्थन करणे म्हणजे राष्ट्रनिष्ठेला दुय्यम ठरवणे, मातीशी बेईमानी करणे आणि धर्मांध अतिरेकी वृत्तीचा पुरस्कार करणे होय.* ही प्रवृत्ती फक्त छत्रपती संभाजीनगर नामकरणापूर्तीच सिमीत आहे इतक्या मर्यादित अर्थाने याकडे बघितले जाऊ नये.औरंगजेबासारख्या शोषक राज्यकर्त्याचे जे धर्मवेडे लोक समर्थन करतात ते लोक वर्तमानातील अतिरेक्यांचे समर्थक नसतील कशावरून? धर्माच्या नावाने एक मोठा वर्ग इथल्या मातीशी बेईमानी आणि देशाशी गद्दारी करण्यासाठी सरसावत असल्याचे सरळ सरळ दिसते आहे.धर्मापुढे राष्ट्रनिष्ठा दुय्यम असा संदेश हे लोक उघडपणे आंदोलनात्मक भूमिका घेऊन देत आहेत.ही प्रवृत्ती महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी घातक आहे.या प्रवृत्तीला वेळीच रोखले नाही तर हिच धर्मांध,अतिरेकी प्रवृत्ती उद्या या महान देशाचे तुकडे पाडल्यावाचून राहणार नाही.

      भविष्यात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घ्यावा अशा याचना कराव्या लागल्या तर नवल वाटू नये!

म्हणून जुलमी औरंगजेबाच्या नावाला विरोध आणि रयतेचे कल्याण साधणार्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाच्या समर्थनासाठी एकत्र यावे लागेल.विषय केवळ एका शहराच्या नामांतराचा नाही,हा विषय आहे देशविघातक धर्मांध प्रवृत्तीला चाप लावण्याचा.

     एमआयएमचे खासदार जलील स्वधर्मीयांची एक गठ्ठा मतं आणि आपल्या राजकिय स्वार्थासाठी देशहित,समाज हिताचा विचार अव्हेरून इतक्या खालच्या थराला जाणार असतील तर अशा प्रवृत्तीला जागा दाखवण्यासाठी पुन्हा एकदा मावळ्यांनो शिवछत्रपतींचा भगवा हातात घेऊन हर हर महादेवची गर्जना करावीच लागेल.

    जय शिवराय ! जय शंभुराजे!

- ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे राष्ट्रीय वारकरी परिषद, महाराष्ट्र राज्य, प्रवक्ते

- ह.भ.प. विठ्ठल महाराज अभंग 

राष्ट्रीय वारकरी परिषद, महाराष्ट्र राज्य, सेवा विभाग प्रमुख