शिवप्रहार न्यूज - पोलिसांनी दीड लाखाचे मोबाईल शोधून केले परत;तक्रारदारांनी पोलिसांचे मानले आभार…
पोलिसांनी दीड लाखाचे मोबाईल शोधून केले परत;तक्रारदारांनी पोलिसांचे मानले आभार…
नगर- कोतवाली पोलिसांनी हरवलेले तसेच चोरीला गेलेले महागडे मोबाईल मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. कोतवाली पोलिसांनी २ महिने विशेष मोहीम राबवून तांत्रिक कौशल्यावर तपास करत चोरी गेलेले मोबाईल हस्तगत केले. १ लाख ४४ हजार ९०० रुपये किमतीचे मोबाईल तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परत केले आहेत.
मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र, कोतवाली पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत. मोबाईल फोन सारख्या लहान गोष्टींचा शोध घेण्यास वेळ लागतो. मात्र, कोतवाली पोलिसांनी मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदार आणि मूळ मालकांना ते परत केले आहेत. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून मोबाईल शोधण्याचे आदेश कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते.
कोतवाली पोलिसांनी मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. चोरीतील विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग या कंपनीचे मोबाईल मिळून आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते मूड तक्रारदार यांना दीड लाख रुपये किंमतीचे मोबाईल परत देण्यात आले आहेत. हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोना/1381 सलीम शेख, पोकॉ/759 राजेंद्र फसले व दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ/ प्रशांत राठोड यांनी पार पाडली.
..............................
मोबाईल यांना मिळाले परत
रंगनाथ दिवटे (रा.आगरकर मळा), विठ्ठल कृष्णराव जोशी (रा.आनंदी बाजार), प्रवीण विठ्ठल भालेकर (रा.केडगाव), जयश्री पुरोहित (रा.नविपेठ), सलमान आरिफ खान (रा.बेपारी मोहल्ला), गौरव आखाडे (रा.माळीवाडा), जालिंदर नवनाथ पुलावळे (रा.केडगाव), सारिका अडागळे (रा.कोठी), सोनाली साठे (रा.माळीवाडा), अशोक घेवरे (रा.स्टेशन रोड), सुनील कांबळे (रा.बुरुडगाव), प्रफुल्ल जाधव (रा.भिंगार).