शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात अधिकाऱ्याचे घर फोडून चोरी....

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात अधिकाऱ्याचे घर फोडून चोरी....

श्रीरामपुरात अधिकाऱ्याचे घर फोडून चोरी....

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं.७ मध्ये महावितरणचे कार्यकारी अभियंता यांचे घर फोडून अज्ञात चोरटयाने ४४ हजार रूपयांचे दागिने तसेच रोकड चोरून नेली आहे.

   याबाबत, शरद किसनराव बंड, वय-५०, धंदा-कार्यकारी अभियंता, महावितरण, सद्या नोकरी प्रकाशगड, बांद्रा, मुंबई येथे मूळ रा.यशोदीप बंगला, वॉर्ड नं. ७, चोथाणी हॉस्पीटलच्या मागे, श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवार दि.२२ जुलै रोजी १० ते दि. रविवार दि.२३ जुलैच्या ६.३० यादरम्यान आपल्या यशोदीप बंगल्याच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयाने घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे नेकलेस, टिव्ही, पितळी भांडे, २ हजारांची रोकड असा ४४ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.