शिवप्रहार न्युज - मा.आ.भानुदास मुरकुटे समर्थकांसह बीआरएस मध्ये...

शिवप्रहार न्युज -  मा.आ.भानुदास मुरकुटे समर्थकांसह बीआरएस मध्ये...

मा.आ.भानुदास मुरकुटे समर्थकांसह बीआरएस मध्ये...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार, अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

    तेलंगणा सरकारने तेथील शेतकऱ्यांना दिलेल्या विविध योजनांमुळे माजी आमदार मुरकुटे हे भारावून गेले होते. आठ ते दहा दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री राव यांची भेट घेतलेली होती. आताही आपल्या निवडक समर्थकांसह ते तेलंगणा येथे तेथील सरकारने केलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी गेलेले होते. याच दरम्यान मुरकुटे यांनी बीआरएस मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

   आपल्या समर्थकांसह मुरकुटे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.